उमरी : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवमतदार नोंदणी, शिवसैनिक सभासद नोंदणी व नवीन शाखांची स्थापना करण्यात आली. उमरी शहरांतर्गत व वार्डनिहाय तीन नवीन शिवसेनेच्या शाखांची स्थापना करण्यात आली.यात पहाड गल्ली, हनुमान गल्ली व रापतवार नगर अशा तीन वार्डामध्ये नवीन शाखा तयार करण्यात आल्या. जिल्हाप्रमुख उमेश मुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर तालुकाप्रमुख सुभाष पेरेवार , शहर प्रमुख महेश पडोळे, हनुमान गल्ली शाखा प्रमुख गोपाळ लोध, उपप्रमुख राजींदरसिंघ खिच्ची, रापतवार नगर शाखा प्रमुख राम ठाकूर, उपप्रमुख रमेश कूट्टेवाड , पहाड गल्ली शाखाप्रमुख सचिन मंत्रीवाड, उपप्रमुख लक्ष्मण अहिरे तसेच धानोरा शाखा प्रमुख ज्ञानेश्वर मामडे, लक्ष्मण सामलवार, शंकर राचेवाड, संतोष गंगासागरे, साई खांडरे, संजय हंबर्डे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
उमरीत शिवसेनेच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 4:32 AM