महावितरणच्या कंधार उपविभागांतर्गत भेंडेवाडी व महालिंगी गावातील शेतकऱ्यांना महा कृषी ऊर्जा अभियानाची सविस्तर माहिती दिल्यानंतर अभियानाच्या माध्यमातून थकबाकीतून मिळणारी सूट लक्षात घेऊन शेतकरी कृषिपंपांचे थकीत वीजबिल कोरे करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. कुरूळा शाखेंतर्गत येणाऱ्या भेंडेवाडी गावातील ४५ शेतकऱ्यांनी दोन दिवसात २ लाख ५० हजार रूपयांचा वीजबिल भरणा केला आहे.
महालिंगी गावातील १२ शेतकऱ्यांनी ७० हजार ५०० रूपयांचा भरणा करत आपले वीलबिल कोरे केले. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डाॅ. नरेश गीत यांच्या पुढाकाराने काही महिन्यापूर्वी महावितरणने राबविलेल्या एक गाव एक दिवस या उपक्रमांतर्गत केलेल्या ग्राहकभिमुख कामाचाही फायदा हे अभियान यशस्वी करण्यासाठी होत आहे. अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंता संतोष वहाणे यांच्या निर्देशानुसार नांदेड ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण, कार्यकारी अभियंता स्नेहा हंचाटे, उपकार्यकारी अभियंता पंकज देशमुख, महेश वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.