- गोविंद टेकाळेअर्धापूर ( जि. नांदेड ) :नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरू असताना वधूपित्याचा अपघातीमृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी ( दि.२८) मार्च रोजी घडली. मुलीचे लग्न महिनाभरावर आलेले असताना घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वाघजी सखाराम लिंगायत (४५ वर्षे रा.चोरंबा ता.अर्धापूर) हे अर्धापूर शहरातील व्यंकटराव साखरे यांच्याकडे सालगडी म्हणून काम करतात. वाघजी मंगळवारी सायंकाळी ८ वाजता दैनंदिन वस्तू खरेदीसाठी सायकलवर शहरात जात असतांना अर्धापूर शहरातील कृषी कार्यालयासमोर पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी महामार्ग, अर्धापूर पोलीस यांनी धाव घेतली व मयतांचे पार्थिव पुढील सोपस्कारासाठी ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे पाठविण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
पुढील महिन्यात होते मुलीचे लग्नवाघजी लिंगायत यांची मुलगी नेहाचा नुकताच साखरपुडा झालेला आहे. पुढील महिन्यात तिच्या लग्नाची तारीख काढणार होते. दरम्यान, घरात नेहाच्या लग्नाची तयारी सुरु झाली होती. अशी लगबग सुरू असताना वधुपित्याचे अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जड वाहनास प्रवेश बंदचा रोजच उडतो फज्जाशहरात अवजड वाहनास प्रवेश बंद आहे. परंतु बंदी झुगारून रोज अनेक वाहने शहरात येतात. त्याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यातूनच अशा अपघाताच्या घटना घडत असल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त केला आहे.
गुत्तेदारांचा हलगर्जीपणा वाटेल तिथे खोदकामरस्त्याचे काम सुरू असून गुत्तेदार वाटेल तिथे खोदकाम करून वाहतुकीस व वाहन चालकांना अडथळा निर्माण करत आहेत. रस्ता उखडून ठेवल्याने धुळ व चुरीमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातच अनेक गाड्या घसरून पडत आहेत. संबंधितांनी लक्ष देऊन वाहतुकीस अडथळे येणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत.