नांदेड- गाडीपुरा भागातील विहिरीजवळ तसेच इतवारा भागात अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे वार्डातील तरूण मुलांवर वाईट परिणाम होत आहेत. इतवारा पोलीस ठाण्याने या भागातील अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे स. दिलीपसिंघ सोडी यांनी निवेदनाद्वारे केले आहे. गाडीपुरा जुना माेंढा, हबीब टाकी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. हे अवैध धंदे बंद करावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
वडगावचे ग्रामस्थ बहिष्कार टाकणार
नांदेड- जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागणार नाही, तोपर्यंत सर्व निवडणुकीवर नांदेड तालुक्यातील वडगाव येथील सकल मराठा समाज बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दिले. ग्रामपंचायत तसेच इतर कोणत्याही निवडणुकीवर मराठा समाजाचा वतीने एक मताने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.