लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषदेतील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी तसेच शिक्षकांची बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेत समुपदेशन प्रक्रियेद्वारे सुरू आहे. याअंतर्गत विविध विभागातील २४४ कर्मचा-यांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात आल्या असून मंगळवारी आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या बदल्या रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. दरम्यान, २४४ बदल्यांमध्ये ९१ कर्मचा-यांच्या बदल्या प्रशासकीय, २८ कर्मचा-यांच्या बदल्या आपसी तर १२५ कर्मचा-यांच्या बदल्या विनंतीद्वारे करण्यात आल्या आहेत.शासनाने जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने १३ मे पासून जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशन पद्धतीने बदली प्रक्रिया पार पाडली. या प्रक्रियेअंतर्गत सामान्य प्रशासन विभागातील ६३ कर्मचा-यांतील १२ प्रशासकीय तर ३६ बदल्या या विनंतीनुसार करण्यात आल्या आहेत. यात दोन वरिष्ठ सहाय्यक, १० कनिष्ठ सहायकांच्या प्रशासकीय तर १२ वरिष्ठ आणि ३६ कनिष्ठ सहायकांच्या विनंतीनुसार बदल्या झाल्या आहेत. ग्रामपंचायत विभागातील ७३ कर्मचा-यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात ३२ प्रशासकीय तर २५ कर्मचाºयांच्या बदल्या विनंतीनुसार करण्यात आल्या असून १६ बदल्या आपसी आहेत. बदल्या झालेल्यांमध्ये ग्रामपंचायत विभागातील दोन विस्तार अधिकारी, ६ ग्रामविकास अधिकारी आणि २४ ग्रामसेवकांच्या प्रशासकीय तर ६ विस्तार अधिकारी, ५ ग्रामविकास अधिकारी आणि १४ ग्रामसेवकांच्या विनंती बदल्या झाल्या आहेत तर १ विस्तार अधिकारी आणि १५ ग्रामसेवकांची आपसी बदली करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण विभागातील ३९ पर्यवेक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात १९ पर्यवेक्षकांच्या प्रशासकीय दहा विनंती आणि १० बदल्या आपसी झाल्या आहेत. वित्त विभागातील ११ कर्मचा-यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात प्रत्येकी २ प्रशासकीय आणि आपसी तर सात बदल्या विनंतीनुसार करण्यात आले आहे. शिक्षण विभागातील ११ जणांच्या बदल्या केल्या आहेत. यात २ केंद्र प्रमुख आणि २ अराजपत्रित मुख्याध्यापक अशा चौघांच्या प्रशासकीय, ७ केंद्रप्रमुखांच्या विनंती बदल्या झाल्या आहेत. याबरोबरच बांधकाम विभागातील (दक्षिण आणि उत्तर) १४ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यात ३ कनिष्ठ अभियंता, २ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अशा ५ जणांच्या प्रशासकीय. ८ कनिष्ठ अभियंता आणि एक स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अशा नऊ जणांच्या विनंती बदल्या झाल्या आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील दोन, कृषी विभागातील चौघांच्या बदल्या झाल्या.विस्तार अधिकाºयाची एक बदली प्रशासकीय तर एक कृषि अधिकारी आणि दोन विस्तार अधिका-यांच्या बदल्या विनंतीनुसार करण्यात आल्या आहेत. पशुसंवर्धन विभागातील २७ जणांच्या बदल्या झाल्या आहेत. यात १५ पशुधन पर्यवेक्षकांच्या प्रशासकीय, १ सहा़ पशुधन विकास अधिकारी आणि ११ पशुधन पर्यवेक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या़तांत्रिक चुकामुळे प्रक्रियेला उशीरजिल्हा परिषदेत मंगळवारी आरोग्य विभागाची बदली प्रक्रिया सुरू असताना काही महिलांच्या चेह-यावर अश्रू होते. अपेक्षित ठिकाणी बदली न झाल्याने त्या अधिका-यांसह पदाधिका-यांकडे जावून विनंती करीत होत्या. यावर नियमानुसार बदल्या झाल्याने आम्ही काहीच करु शकत नाही, असे उत्तर त्यांना ऐकावे लागत होते. दरम्यान, काही बदल्यावेळी सेवाज्येष्ठता यादी डावलल्या गेल्याचे पुढे आले. बदलीसाठी एका आरोग्यसेविकेचे नाव पुकारल्यानंतर सदर महिलेने उभे राहून मी कनिष्ठ असताना बदली प्रक्रियेसाठी माझे नाव पात्र ठरले. मात्र माझ्याहून अधिक सेवाज्येष्ठता असलेल्या कर्मचा-याची बदली कशी नाही? असा सवाल केला. यावर सेवाज्येष्ठता यादी तपासली असता सदर महिला बदलीसाठी पात्र नसल्याचे आढळून आले. यावर सदर महिलेची बदली स्थगित करण्यात आली. इतर काही महिलांच्याही अशाच पद्धतीच्या तक्रारी होत्या. विभागप्रमुखांच्या या तांत्रिक चुकांमुळेच बदली प्रक्रिया पार पडण्यास विलंब होत होता़जिल्हा परिषदेच्या अधिका-यांचा अभ्यास कच्चा !मंगळवारी जिल्हा परिषदेत आरोग्य विभागाची बदली प्रक्रिया सुरू होती. बदलीसाठी आरोग्यसेविकेचे नाव पुकारल्यानंतर सदर महिला कर्मचाºयाने माईक हातात घेऊन विधवा असल्याने मला नियमानुसार बदली प्रक्रियेतून सूट द्यावी, अशी विनंती केली. मात्र यावेळी बदली प्रक्रिया राबवित असलेले प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेश आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) तुबाकले यांनी तसा नियम नसून आपल्याला तशी सूट देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर सदर महिला कर्मचाºयांनी बदली प्रक्रियेवेळी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यासह समाजकल्याण सभापती शीला निखाते यांच्याकडे जात विधवा, परित्यक्त्या महिला कर्मचाºयांना बदलीत सूट असल्याचा नियम सांगितला. यावर उपाध्यक्ष जाधव यांनी हस्तक्षेप करित नियम तपासण्यास सांगितले. त्यानंतर नियमानुसार सदर महिला कर्मचाºयास सूट देण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष जाधव यांनी अधिका-याना बदली प्रक्रियेवेळी अभ्यास करुन बसायला हवे होते, असे सुनावले.
नांदेड जिल्हा परिषदेतील २४४ कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:34 AM
जिल्हा परिषदेतील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी तसेच शिक्षकांची बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेत समुपदेशन प्रक्रियेद्वारे सुरू आहे. याअंतर्गत विविध विभागातील २४४ कर्मचा-यांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात आल्या असून मंगळवारी आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या बदल्या रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.
ठळक मुद्दे९१ कर्मचा-यांच्या प्रशासकीय बदल्या तर १२५ जणांची विनंती मान्य