नांदेड: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मूक्त विद्यापीठाच्यानांदेड विभागीय केंद्रात आॅनलाईन पेपर मूल्यांकन केलेल्या संमत्रक आणि केंद्राना गत पाच महिन्यापासून मानधन मिळाले नाही़ नाशिक विद्यापीठाने विभागीय केंद्राला १ कोटी ४० लाखाचा निधी देवूनही मानधन न मिळाल्याने एवढा निधी कुठे खर्च केला असा प्रश्न निर्माण झाला आहे़ दरम्यान, ज्यांच्या काळात हा निधी मिळाला होता ते दोन्ही अधिकारी मात्र बदली करून गेल्याने या निधीची आता विद्यापीठ स्तरावर चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मूक्त विद्यापीठाचे गत दोन वर्षापासून पेपर मूल्यांकनाचे काम आॅनलाईन पद्धतीने सुरू आहे़ नांदेड विभागातंर्गत हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यातील २९ तपासणी केंद्रात जवळपास १ हजार ५०० समंत्रक प्राध्यापकांनी मूल्यमापनाचे काम केले होते़ मात्र पेपर मूल्यांकन करून पाच महिन्याचा कालावधी लोटूनही मानधन मिळाले नाही़ विद्यापीठाने नांदेड विभागातील परिक्षेचे देयके व आॅनलाईन पेपर मूल्याकंनासाठी १ कोटी ४० लाखाचा निधीही दिला होता़ परंतु एवढा निधी तत्कालीन सहायक कुलसचिव यांनी कुठे व कोणत्या कामासाठी खर्च केला, हा प्रश्न उपस्थित झाला असून याच्या चौकशीसाठी समिती नेमल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नांदेड विभागातंर्गत हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यातील २९ तपासणी केंद्रात जवळपास १ हजार ५०० समंत्रक प्राध्यापकांनी मूल्यमापनाचे काम केले होते़ या सर्वांना मानधनाची प्रतीक्षा लागलेली असून विद्यापीठाने तातडीने मानधन अदा करावे, अशी मागणी होत आहे.
आठवडाभरात मानधन वितरित करुपेपर मूल्यांकन व केंद्राची देयके काही तांत्रिक कारणामुळे संबंधितांना मिळू शकले नाहीत़ यापूर्वीचे अधिकारी बदली होवून दुसºया विभागात गेले आहेत़ त्यामुळे मानधन देण्यास विलंब झाला आहे़ मात्र पुढील आठवड्यात मानधन देण्यात येईल़ असे विभागीय कार्यालयातील रवींद्र रनाळकर यांनी सांगितले.
आठ ते दहा दिवसात मिळेल आॅनलाईन पेपर मूल्याकंनाचे मानधन अद्याप मिळू शकले नाही़, ही वस्तुस्थिती आहे. विद्यापीठाने विभागासाठी दिलेल्या निधीचा हिशोब सादर करणे अद्याप बाकी आहे़ हा हिशोब व अनामत रक्कम यांचा ताळमेळ झाल्यानंतर येत्या आठ, दहा दिवसात तातडीने मूल्याकंनाचे मानधन देण्यात येणार आहे.- अविनाश सरनाईक, विभागीय संचालक, मूक्त विद्यापीठ, नांदेड