नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला ग्रीन कनेक्ट सोलर रूप टॉप ऊर्जा प्रकल्पासाठी जवळपास दीड कोटी रुपये रुसाकडून अनुदान मिळाले आहे. त्यानुसार विद्यापीठाने २७७ किलोवॅट ग्रीड कनेक्टेड सौर रूम टॉप पॉवर प्रकल्प कार्यान्वित केल्याची माहिती कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी दिली.
विद्यापीठाला ग्रीन कनेक्ट सोलर रूप टॉप ऊर्जा प्रकल्पासाठी जवळपास दीड कोटी रुपये रुसा संस्थेकडून अनुदान मिळाले असून विद्यापीठाने २७७ किलोवॅट ग्रीड कनेक्टेड सौर रूम टॉप पॉवर प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजातील अडथळे दूर झाले आहेत. विद्यापीठाच्या मागील दोन वर्षांतील शैक्षणिक कामाचा आढावा देताना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले, अभियांत्रिकी विज्ञान आणि इतर कुशल मनुष्यबळ रोजगारनिर्मितीसाठी विद्यापीठाकडून लिगो प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा आणि त्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, या हेतूने विद्यापीठाने विविध परिसंवाद आणि कार्यशाळेचे आयोजन केले आहेत. लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन अध्यापन व अध्ययन यासाठी देशभरातील जवळपास १७ हजार शिक्षकांना विद्यापीठाने प्रशिक्षण दिले आहे.
संशोधनाचा विस्तार वाढविण्यासाठी विद्यापीठाने पुस्यान नॅशनल युनिव्हर्सिटी, सह आयर्लंड, चायना आदी आधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सोबत सामंजस्य करार केलेला असून जागतिक विद्यापीठ व स्तरावरचा अभ्यासक्रम विद्यापीठ स्तरावर सुरू केलेला आहे. विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील अध्यापन संशोधन यासाठी आंतरराष्ट्रीय प्राध्यापकांनी वैज्ञानिकांचे कौशल्य याकरिता ग्लोबल इनिशिएटिव्ह फोर अकॅडमिक नेटवर्क जीआयएन ही योजना सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाने संशोधन परिणाम आणि प्रोत्साहन योजना ही नुकतीच कार्यान्वित केली असल्याचेही कुलगुरू डॉ. भोसले म्हणाले.