नांदेडच्या महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री पावडे यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 12:40 PM2021-10-13T12:40:30+5:302021-10-13T12:49:46+5:30
काँग्रेसने अडीच वर्षाच्या महापौर पदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात 2 महापौर करण्याचा निर्णय घेतला होता.
नांदेड- नांदेडच्या 14 व्या महापौर म्हणून काँग्रेसच्या जयश्री निलेश पावडे यांची आज बुधवारी बिनविरोध निवड झाली.
काँग्रेसने अडीच वर्षाच्या महापौर पदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात 2 महापौर करण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वीच्या महापौर मोहिनी येवनकर यांनी राजीनामा दिला. निवड प्रक्रियेत 9 ऑक्टोबर रोजी जयश्री पावडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. आज निवडीची प्रक्रिया पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. नांदेड महापालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे.
नूतन महापौर जयश्री पावडे यांनी शहरातील रस्ते, पाणीप्रश्न, आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. त्यातून विकासकामे पूर्ण केली जातील असेही महापौर जयश्री पावडे यांनी सांगितले.