देगलूर : शहरात प्रथमच सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात आली़ उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या शोभायात्रेने सर्वांचेच लक्ष वेधले़छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी पुलवामा येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सामूहिक जिजाऊवंदना पार पडली. आ. सुभाष साबणे, नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, माजी आ़ रावसाहेब अंतापूरकर, शिवजन्मोत्सव समितीचे तालुकाध्यक्ष अंकुश देशाई देगावकर आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व श्री संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवजन्मोत्सव शोभायात्रेला प्रारंभ झाला. यावेळी शहरातील रस्ते सुशोभित करण्यात आले होते. रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. ज्ञानप्रभा कन्या शाळा, प्रगती माध्यमिक विद्यालय सुगाव, प. पू. गोळवलकर विद्यालय, साधना प्राथमिक शाळा, महात्मा फुले इंग्रजी विद्यालय आदि शाळेच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती, अनिष्ठ प्रथा, मतदार जागृती अभियान, शिवकालीन प्रसंग, आदि विषयांवर शहरातील प्रमुख चौकांत पथनाट्य सादर केले.उन्हाच्या तीव्रतेत शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. जय जिजाऊ, जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या. शोभायात्रेत जुन्नर येथील ढोल-ताशांचे पथक लक्षणीय होते. घोड्यावर जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर यांची वेषभूषा केलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी अश्वारुढ झाले होते. याशिवाय रथ, तोफ, तुतारी, उंट, भजनी मंडळ, आदिवासी नृत्य व लेझीम पथकाने संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.शोभायात्रेत आ. सुभाष साबणे, माजी आ़रावसाहेब अंतापूरकर, नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, अंकुश देशाई देगावकर, संभाजीराव मंडगीकर, रमेश देशमुख शिळवणीकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, जि़ प़ सदस्या डॉ़ मीनल पाटील खतगावकर, बालाजी पाटील अंबुलगेकर, महेश पाटील, अवधूत भारती, लक्ष्मीकांत पद्मवार, बालाजी रोयलावार, तुळशीराम संगमवार, अविनाश निलमवार, धोंडिबा कांबळे, सुजित कांबळे, अशोक गंदपवार, शत्रुघ्न वाघमारे, डॉ विनायक मुंडे, डॉ़सदावर्ते, डॉ. गुंडेराव गायकवाड, विक्रम साबणे, महेमूद, प्रशांत दासरवाड, श्याम पाटील कुशावाडीकर, मीरा मोहियोद्दीन, शंकर पाटील मैलापुरे, व्यंकट पाटील सुगावकर, व्यंकट पुरमवार, अनिल तोताडे, नितेश पाटील, भगवान जाधव, बाबू मिनकीकर, चंद्रकांत मोरे, विकी शिंदे, निखिल कोठारे, जनार्दन बिरादार, शिवा डाकोरे आदी उपस्थित होते.कंधार शहरात भव्य मिरवणूककंधार : सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने शहरात सकाळी शिवअभिषेक श्री गुरू महंत एकनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मोटार सायकल रॅली व भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात महिलांचा फेट्यांसह सजीव देखावे लक्षवेधी ठरत होते. सजीव देखाव्यात अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ सहभागी झाले होते. मिरवणुकीत आ़ प्रतापराव पाटील चिखलीकर, जि़ प़ सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, संजय भोसीकर, शिवसेना नेते अॅड.मुक्तेश्वर धोंडगे, जि.प.सदस्या प्रा. डॉ.संध्याताई धोंडगे, प्रा.चित्राताई लुंगारे, परमेश्वर पा. जाधव, संभाजी पा.लाडेकर, धनराज लूंगारे, बळीराम पवार, नामदेव कुटे, व्यंकट गव्हाणे, आत्माराम पा.लाडेकर, प्रा.डॉ.शिवराज मंगनाळे, सचिन जाधव, पं.स.सदस्य उत्तम चव्हाण, अॅड.गंगाप्रसाद यन्नावार, मधुकर डांगे, नगरसेवक शहाजी नळगे, सुनील कांबळे आदीसह राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते तरूण, स्त्री-पुरूष सहभागी होते. उशिरापर्यंत मिरवणूक चालू होती. पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
देगलुरात अभूतपूर्व शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:55 AM
शहरात प्रथमच सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात आली़ उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या शोभायात्रेने सर्वांचेच लक्ष वेधले़
ठळक मुद्देशिवजन्मोत्सव सोहळा चौकाचौकांत पथनाट्य सादरशिवकालीन देखाव्यांनी लक्ष वेधले