नांदेडसह मराठवाड्यात अवकाळी पाऊस, गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यानुसार शेतक-यांनी शेती कामाला वेग दिला आहे. परंतु, अनेकांची गहू कापणी सुरू आहे. त्यातच विजांचा कडकडाट आणि जोराचा वारा असल्याने केळीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. टरबूज, खरबूज पिकांनादेखील फटका बसला आहे.
जिल्ह्यात एकूण सरासरी १.०९ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये नांदेड तालुका - ४.६ मि.मि., बिलोली- ०१. मिमी., मुखेड- १.४ मिमी., कंधार - ०.७ मिमी., लोहा-३.०६ मिमी., हदगाव- २.१ मिमी., देगलूर - ०.२ मिमी., किनवट - १.०० मिमी., मुदखेड- १.०० मिमी., हिमायतनगर -०.१ मिमी., माहूर - ७.०० मिमी., धर्माबाद - ०० मिमी., अर्धापूर- ७.०८ मिमी. नायगाव तालुक्यात ०.७ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.