१८ फेब्रुवारीच्या रात्रीपासून व शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे गहू, टाळका, मका पीक आडवे पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने नुकसानीत आलेला शेतकरी आता रब्बी हंगामात अवकाळी पाऊस झाल्याने पुरता हवालदिल झाला आहे. हाती आलेले पीक खरीप हंगामासारखे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
रब्बी हंगामातील पिके चांगल्या स्थितीत आली असून मागील नुकसान भरून काढतील, अशी अशा शेतकऱ्यांना होती. मात्र, ऐन पिके काढणीला आल्याच्या मोसमात अवकाळी पाऊस सुरू झाल्याने हरभरा भिजला गहू, टाळका, मका पिके आडवी झाले आहेत. सरसम, दुधड, वाळकेवाडी, धानोरा, पोटा, कामारी, टेंभुर्णी, विरसनी, डोल्हारी, शेलोडा, सिरंजणी, हिमायतनगर, आदींसह अनेक ग्रामीण भागांत पावसाचा फटका पिकांना बसला आहे.