डिजिटल पेमेंटच्या माध्यमाचा वीज ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. मार्चअखेर नांदेड परिमंडळातील १ लाख ४० हजार वीज ग्राहकांनी २७ कोटी रुपये वीज बिल भरले आहे. ग्राहकांना ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेट बॅकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डांसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्डचा पर्यायही उपलब्ध आहे. मात्र अजूनही १० टक्के ग्राहक धनादेशाद्वारे वीज बिल भरतात. काही ग्राहकांच्या खात्यात रक्कम नसल्याने हे चेक बाऊन्सही झाले आहेत.
ग्राहकांना दिली जाते संधी
काही ग्राहकांच्या खात्यात रक्कम नसल्याने चेक परत येतात. अशा ग्राहकांना याबाबत माहिती देऊन त्यांना एक संधी दिली जाते. आता डिजिटल माध्यमाच्या काळात ऑनलाईन सोयीद्वारे वीज बिलाचा भरणा करण्याची सोय आहे. त्याचा ग्राहक अधिक प्रमाणात लाभ घेताहेत.
वीजबिल वेळेवर भरा
अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरण बांधिल आहे. मात्र त्यासाठी ग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरणे आवश्यक आहे. हे बिल भरताना आपला चेक बाऊन्स होणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंता