विषाणूजन्य आजार- दरवर्षी पावसाळ्यात व हिवाळ्याच्या प्रारंभी विषाणूजन्य आजारांचे रूग्ण दवाखान्यात मोठ्या संख्येने दाखल होत असे. मात्र यंदा कोरोनामुळे बहुतांशी नागरिक तोंडावर मास्क लावत आहेत. त्यामुळे कोरोनासोबत त्यांना इतर आजारापासूनही संरक्षण मिळत आहे. विशेषता प्लू, सर्दी, निमोनिया, ॲलर्जी, क्षयरोग, दमा यासारखे विषाणूजन्य आजार बळावत असल्याने मागील वर्षी अशा रूग्णांची संख्या अधिक होती. मात्र यंदा कोरोनामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली. अनेक चांगल्या सवयी त्यांनी लावल्यामुळे सामान्य आजारांपासून ते दूर राहिले.
चौकट- मागील वर्षी विषाणूजन्य आजारांची ओपीडी २ हजारावर होती. मात्र आता नागरिकांनी मास्क बांधल्यामुळे या आजारांचे रूग्ण कमी असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे विषाणूजन्य आजार असलेल्या सर्वसाधारणपणे १ हजार १०० रूग्णांची नोंद झाली आहे. नागरिकांनी सतत मास्कचा वापर केल्यामुळे इतर आजारांपासून त्यांना संरक्षण मिळाले, ही सवय नेहमी लावल्यास साथरोगांपासून नक्कीच बचाव होऊ शकतो. - डॉ. वाय. एस. चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, नांदेड.