नांदेड : देशपातळीवर दिवसेंदिवस हवामानामध्ये मोठे बदल होत आहेत़ याचा सूक्ष्म पद्धतीने शास्त्र अभ्यास करीत आहेत़ अनेक प्रगत तंत्रज्ञानाद्वारे सूक्ष्म पद्धतीने या बदलाची नोंद होत आहे़ त्यामुळे हवामान बदलामध्ये तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे, असे मत स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़उद्धव भोसले यांनी व्यक्त केले़स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूशास्त्र संकुलातर्फे दोन दिवसीय ‘पर्यावरणविषयक हवामान बदल आणि जैविक साधनसंपत्ती : व्यवस्था’ या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी कुलसचिव डॉ़ रमजान मुलाणी, प्रा़ डॉ़ शंकर मूर्ती, प्रा़डॉ़प्रवीण सप्तर्षी, प्रा़ डॉ़ मुळे, प्रा़डॉ़ एस़ गंगाधरराव यांची प्रमुख उपस्थिती होती़कुलगुरू डॉ़ भोसले म्हणाले, जागतिक तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे त्यावर सर्वच राष्ट्र सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करीत आहेत़ या तापमानवाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत़ भारतामधील तरूण शास्त्रज्ञाने पुढे येवून भरीव योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले़चर्चासत्रात पुणे विद्यापीठाचे प्रा़डॉ़सप्तर्षी यांनी हवामान बदल व आजचे बदलते पर्यावरण, मुंबई येथील प्रा़डॉ़शंकर मूर्ती यांनी सुरक्षा नियमानुसार पर्यावरणाचे संरक्षण, औरंगाबाद विद्यापीठातील प्रा़ मुळे यांनी प्रदूषणाचे पर्यावरणावर होणारे परिणाम तर प्रा़ डॉ़ व्ही़ राजमणी, प्रा़डॉ़ एम़ शेषासाई आदींनी चर्चा केली़ यावेळी भूशास्त्र संकुलाचे संचालक प्रा़ डॉ़ के़ विजयकुमार, प्रा़डॉ़ आऱ डी़ कपले, डॉ़ एच़ एस़ पाटोडे, डॉ़दीपाली साबळे, डॉ़योगेश लोळगे, डॉ़ डी़ बी़ पानसकर, डॉ़ पी़ ए़ खडके, डॉ़ ए़ एस़ कदम, डॉ़व्ही़ एम़ वाघ, प्रा़ डॉ़ कृष्णम्माचार्युलु यांची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन डॉ़ टी़ विजयकुमार यांनी केले तर डॉ़अर्जुन भोसले यांनी आभार मानले़
हवामान बदलामध्ये तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 12:40 AM
देशपातळीवर दिवसेंदिवस हवामानामध्ये मोठे बदल होत आहेत़ याचा सूक्ष्म पद्धतीने शास्त्र अभ्यास करीत आहेत़ अनेक प्रगत तंत्रज्ञानाद्वारे सूक्ष्म पद्धतीने या बदलाची नोंद होत आहे़
ठळक मुद्देकुलगुरू डॉ़ उद्धव भोसले यांचे प्रतिपादन