विद्यापीठातील आरोग्य केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि नांदेड वाघाळा महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण शिबिरामध्ये आजपर्यंत ज्यांचे लसीकरण झालेले नाही. असे आणि ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांच्यासाठी दोन्हीही प्रकारच्या कोवॅक्सिन व कोविशिल्ड लस ठेवण्यात आलेल्या होत्या.
या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. वैजयंता पाटील, डॉ. बालासाहेब कुंटूरकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंढे, डॉ. सुरेखा मुंगल यांची विशेष उपस्थिती होती. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी आरोग्य केंद्राचे कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी यांनीही विशेष परिश्रम घेतले.