लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वैशाली माने हिस न्या़जहांगीर पठाण यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ तब्बल ३६ दिवस लोटूनही सुरेखा राठोड यांचे मारेकरी शोधण्यास पोलिसांना यश आले नाही़मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांचा २३ आॅगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरी दिवसाढवळ्या धारधार शस्त्राने निर्घृणपणे खून करण्यात आला़ या प्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून आरोपी मयताचे पती प्रा़विजय राठोड, त्याची मैत्रीण वैशाली माने, अशोक टोपा राठोड व प्रमोद उर्फ अजय थोरात यांचेविरुद्ध किनवट पोलिसांनी कट रचून खून केल्याचा गुन्हा नोंदविला़ या गुन्ह्यात विजय राठोड, प्रमोद थोरात व या दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले़ विजय राठोड चौदा दिवस व प्रमोद थोरात बारा दिवस पोलीस कोठडीत राहुनही गुन्ह्याची उकल झाली नाही़ त्याचबरोबर वैशाली माने ही दहा दिवस पोलीस कोठडीत राहूनही मारेकरी कोण? खुनाच्या गुन्ह्यात कोणते हत्त्यार वापरले? कट कुठे रचला? हे तपासात उकल होण्याआधीच गुरुवारी वैशाली माने यांना किनवटच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्या जहांगीर पठाण यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ चौथा आरोपी अशोक टोपा राठोड हा अद्यपही फरारच आहे़खून होऊन ३६ दिवस लोटत असतांना ना पोलिसांना खुनाचे धागेदोरे मिळवता आले ना मारेकरी शोधता आले? दरम्यानच्या काळात प्रथम किनवट पोलिसांनी तपास केला पोलिसांच्या तापसावरच संशय व्यक्त करण्यात आला़ त्यानंतर तपास काढून घेत उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेकडे सुपूर्द केला़ तपास सुरू असतांनाच हा तपास काढुन घेत स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला़ मात्र खून प्रकरणाचे गूढ अद्यापही कायम आहे़ आरोपी विजय राठोड व वैशाली माने यांना समोरासमोर सांगड घालून तपास कारण्याकामी व तपास करणे सोयीचे व्हावे म्हणून एक दिवसाची पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिस उपनिरीक्षकाने केली व तसा युक्तिवाद सरकारी अभियोक्ता अशोक पोटे यांनी केला तर दहा दिवसांत काहीही निष्पन्न केलेले नाही असा युक्तिवाद आरोपीचे वकील अॅड़ दिलीप काळे यांनी केला़
वैशाली माने न्यायालयीन कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 1:10 AM
गोकुंदा येथील शांतिनिकेतन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वैशाली माने हिस न्या़जहांगीर पठाण यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ तब्बल ३६ दिवस लोटूनही सुरेखा राठोड यांचे मारेकरी शोधण्यास पोलिसांना यश आले नाही़
ठळक मुद्देसुरेखा राठोड हत्या प्रकरण : ३६ दिवसानंतरही खुनाचे धागेदारे सापडेनात