दुचाकीसाठी विवाहितेचा छळ
नांदेड- माहेरहून दुचाकी घेण्यासाठी ५० हजार रुपये आण या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कंधार तालुक्यातील मानसपुरी येथे २३ वर्षीय विवाहितेचा शारीरिक छळ केला. विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली.
डॉक्टरची दुचाकी लंपास
नांदेड- शहरातील गणेशनगर भागातून डॉ. राजेश्वर पवार यांच्या निवासस्थानासमोरुन चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. या प्रकरणी विकास इंगोले यांच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दहा लाखांसाठी विवाहितेला मारहाण
नांदेड- शहरातील गणराजनगर व ठाणे येथे एका ३३ वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींनी १० लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. हुंड्यातील दहा लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी छळ केल्याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विवाहितेच्या चारित्र्यावर संशय
नांदेड- विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नवीन नांदेडातील गोपाळचावडी जिंदमनगर येथे २९ वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींनी मारहाण केली. माहेराहून पैसे आणण्याची मागणी केली. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.