वड या वृक्षाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्यापासून अधिकाधिक ऑक्सिजनची निर्मिती होते. या उद्देशाने तसेच वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास हातभार लागतो. हा उद्दात हेतू डोळ्यासमोर ठेवून विजयनगर मंगल कार्यालय व हडको येथील शिवाजी उद्यानात ११० महिलांना वटवृक्ष वाटप करण्यात आले. दरम्यान, महापौर मोहिनी येवनकर यांनी कोरोनाकाळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व चांगले कळाले आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने वृक्षलागवड करून संगोपन करावे, असे आवाहन येवनकर यांनी केले. जिल्हा परिषद अध्यक्षा मंगराणी अंबुलगेकर यांनी व महिला बालकल्याण सभापती संगीता पाटील डक यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या डॉ. रेखा पाटील चव्हाण यांनी केले. त्या म्हणाल्या, आपली भावी पिढी प्रदूषणमुक्त राहण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन मी एक तरी वट वृक्ष लावेल व त्याचे संगोपन करेल, असे व्रत महिलांनी घ्यावे, असे आवाहन केले.
चौकट
हडको येथे डॉ. करुणा जमदाडे व सिंधूताई तिडके यांनी वटवृक्ष लावण्याचे आवाहन व वाटप केले. यावेळी नगरसेविका ज्योती रायबोले, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अनिता हिंगोले, शहर उपाध्यक्षा अरुणा पुरी, जिल्हा उपाध्यक्ष पद्मा झम्पलवाड, डॉ. चित्रा पाटील, डॉ. संगीता नीलकंठे, डॉ. प्रतिमा डोनगे, अर्चना पाटील, रेखा मिरासे, प्रिया पुयड, रोळे ताई, जयश्री भायेगावकर, वनिता देवसरकर, देशमुख काकू, जया भोसले आदींची उपस्थिती होती.