नांदेड पंचायत समिती सभापतीपदी वाघमारे तर उपसभापती हाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 03:11 PM2020-01-06T15:11:25+5:302020-01-06T15:12:55+5:30

पंचायत समिती सदस्य शुभलक्ष्मी बालाजी सुर्यवंशी यांना काँग्रेसअंतर्गत गटबाजीमुळे सभापती पदाला मुक्कावे लागले.

Waghmare as Nanded Panchayat Samiti chairperson and Hatkar as Deputy chairman | नांदेड पंचायत समिती सभापतीपदी वाघमारे तर उपसभापती हाटकर

नांदेड पंचायत समिती सभापतीपदी वाघमारे तर उपसभापती हाटकर

googlenewsNext

नांदेड : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे सभापती पद सर्वसाधारण महिला असताना ओबीसी महिलेला सभापती पदावर रूढ करण्यात आले. सभापती म्हणून कावेरी वाघमारे तर उपसभापती म्हणून ऍड. राजू हाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

लिंबगाव गणातील पंचायत समिती सदस्य शुभलक्ष्मी बालाजी सुर्यवंशी यांना काँग्रेसअंतर्गत गटबाजीमुळे सभापती पदाला मुक्कावे लागले. माजी मंत्री डी पी  सावंत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बबन वाघमारे यांच्या भावजयी कावेरी बालाजी वाघमारे यांची सभापती म्हणून वर्णी लागली आहे.

Web Title: Waghmare as Nanded Panchayat Samiti chairperson and Hatkar as Deputy chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.