शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

कंधार तालुक्यातील शेतकरी बोंडअळीच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 6:32 PM

मागील वर्षी लागवड केलेल्या १९ हजार ५५० हेक्टरवरील कापसाला बोंडअळीचे ग्रहण लागले. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित झाल्याने कापसाचा संयुक्तपणे पंचनामा अहवाल  वरिष्ठ पातळीवर पाठवून तीन महिन्यांचा कालावधी संपला.

कंधार (नांदेड ) : मागील वर्षी लागवड केलेल्या १९ हजार ५५० हेक्टरवरील कापसाला बोंडअळीचे ग्रहण लागले. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित झाल्याने कापसाचा संयुक्तपणे पंचनामा अहवाल  वरिष्ठ पातळीवर पाठवून तीन महिन्यांचा कालावधी संपला.  त्यामुळे पुढील पेरणीपूर्व मशागतीला १३ कोटी २९ लाख ४० हजार नुकसान अनुदान मिळणार का? याची प्रतीक्षा ३६ हजार १२७ शेतकऱ्यांना लागली आहे.

मागील वर्षीचा खरीप हंगाम निसर्गचक्राच्या फेऱ्यात सापडला. अत्यल्प पावसाने पेरणी एका टप्प्यात पूर्ण झाली नाही. त्यात पुन्हा  पावसावर शेती पिके असल्याने अल्पश: पावसाने शिवार बहरला नाही. शेतकऱ्यांनी कोट्यवधीची गुंतवणूक केली. परंतु कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली. कापसाची वाढ-पोषण योग्य झाली नाही. बोंडअळीने ग्रासल्याने वेचणीला मजुराचा तुटवडा झाला. वेचणीचे भाव वाढले पण संपूर्ण कापूस घरी आणता आला नाही. पुन्हा बाजारात अपेक्षित भाव मिळाला नाही. पांढरे सोने आधार देईल, ही अपेक्षा फोल ठरली. 

१९ हजार ५५० हेक्टर कापसाची लागवडतालुक्यात ६३ हजार ७४१.६० हेक्टरवर खरीप पेरणी झाली होती. त्यात सोयाबीन लागवड २१ हजार ८८० हेक्टर ही सर्वाधिक होती. त्यानंतर कापूस लागवड १९ हजार ५५० हेक्टर लागवड शेतकऱ्यांनी केली. सहा महसूल मंडळांतर्गत १२३ गावांत लागवड उत्साहाने केली. कंधार महसूल मंडळांतर्गत २ हजार ८७७ हे., कुरुळा- २ हजार ३५८ हे., फुलवळ ३ हजार २३४ हे., उस्माननगर ३ हजार ६६९, बारुळ ३ हजार ९५५ व पेठवडज- ३ हजार ४५७ हे.ची समावेश होता. परंतु कापसाला बोंडअळीने फस्त केले.  नुकसान भरपाई लवकर मिळावी अशी मागणी शेतकरी करु  लागला. ‘लोकमत’ने हा प्रश्न उजागर केला़ पाहणी व पंचनामे करतानाची जाचक बाब अडचणीची ठरु लागले. त्यात सरसकट पंचनामे मुद्या ऐरणीवर आला. राज्य शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला.

महसूल, कृषी, पंचायत आदींचा संयुक्त कापूस नुकसानीविषयीचा अहवाल मोठ्या परिश्रमाने तयार करण्यात आला. १९ हजार ५५० हेक्टर जिरायती होते. ३६ हजार १२७ शेतकऱ्यांना बोंडअळीचा फटका बसला होता. जिरायतीसाठी ६ हजार ८०० प्रमाणे १३ कोटी २९ लाख ४० हजाराची नुकसान भरपाई मदत अपेक्षित धरुन डिसेंबर २०१७ ला वरिष्ठ पातळीवर अहवाल तालुका स्तरावरुन पाठविण्यात आला. तीन महिने उलटले तरी मदत अद्याप मिळाली नाही. पेरणीपूर्व (खरीप) मशागतीने आता वेग घेण्यास प्रारंभ झाला आहे. तुटपुंंजी अनुदान रक्कम आहे. त्यात वाढ व्हावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. परंतु मिळणारी मदतही वेळेत मिळावी, अशी प्रतीक्षा बळीराजाला लागली आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीMONEYपैसाState Governmentराज्य सरकारagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र