शिवराज बिचेवार।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना खाजगी सेवा करावयाची असल्यास त्यांनी व्यवसायरोध भत्ता स्वीकारु नये असे शासनाचे आदेश आहेत़ परंतु, खाजगी सेवा किंवा व्यवसायरोध भत्ता यापैकी कुठलाही विकल्प न निवडता अनेक अध्यापक सर्रासपणे शासनाकडून मिळणारा व्यवसायरोध भत्ता घेतात़ विशेष म्हणजे, रुग्णालयाच्या वेळेत अध्यापक, तज्ज्ञ डॉक्टरांकडून खाजगीत सेवा देण्यात येते़ अशा डॉक्टर, अध्यापकांची आता वैद्यकीय शिक्षण विभागाने माहिती मागवली आहे़ त्यामुळे खाजगीत सेवा देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत महाविद्यालयातील अध्यापकांचा व्यवसायरोध भत्ता व खाजगी वैद्यकीय व्यवसाय याबाबत शासनाने स्पष्टपणे सूचना दिल्या आहेत़ खाजगी वैद्यकीय व्यवसाय किंवा व्यवसायरोध भत्ता यापैकी एका पर्यायाची निवड अध्यापकांना करावयाची आहे़ त्यात खाजगी व्यवसायाची परवानगी मागणाºया अध्यापकांना कोणत्याही परिस्थितीत कार्यालयीन वेळेत मात्र हा व्यवसाय करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत़परंतु, दोन्ही पर्यायातील एकाचीही निवड न करणाºयांची संख्याच अधिक आहे़ त्यामुळे हे अध्यापक, तज्ज्ञ डॉक्टर व्यवसायरोध भत्ता आणि खाजगी व्यवसाय असा दुहेरी लाभ उठवितात़नांदेडच्या डॉ़शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात अशा तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या अधिक आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून बिनभोबाटपणे ते आपला खाजगी व्यवसाय चालवितात़ परंतु, अद्याप यापैकी एकावरही कारवाई झाली नाही हे विशेष़ हे तज्ज्ञ आपल्या वेळेनुसार शासकीय रुग्णालयात हजेरी लावतात़त्यामुळे अत्यवस्थ गरीब रुग्णांना अनेक दिवस उपचारासाठी या तज्ज्ञांची प्रतीक्षा करावी लागते़ अनेकजण तर नाईलाजाने खाजगी रुग्णालयात उपचार घेतात़ परंतु, संबंधित तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशासन हे दोघेही गांभीर्याने घेत नाहीत़ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जवळपास प्रत्येक विभागातील अध्यापक खाजगीत चोखपणे सेवा बजावतात़त्यांनी शहरातील विविध भागात टोलेजंग रुग्णालयेही उघडली आहेत़ त्यात आता खाजगीत सेवा देणाºया अध्यापक, डॉक्टरांची वैद्यकीय शिक्षण विभागाने माहिती मागविली आहे़ त्यामुळे अशा डॉक्टरांवर आता काय कारवाई होते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़---अधिष्ठातांचा अभिप्राय महत्त्वाचावैद्यकीय शिक्षण विभागाने मागवलेल्या माहितीत अध्यापकाचे नाव, विकल्प दिल्याचा दिनांक, खाजगी व्यवसाय करीत असलेल्या रुग्णालयाचे नाव आणि अधिष्ठातांचा अभिप्राय यांचा समावेश आहे़ त्यामुळे खाजगीत सेवा देणाºया किती अध्यापकांची सत्य माहिती प्रशासनाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठविली जाते अन् त्यावर अधिष्ठाता काय अभिप्राय देतात,हे महत्त्वाचे आहे.---शासकीयमध्ये आलेले रुग्णही खाजगीतशासकीय रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात़ त्यातील अनेकांना शस्त्रक्रियेची गरज असते़ त्यासाठी ते या ठिकाणच्या संबंधित विभागात दररोज खेटे घालतात़ परंतु, या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरच उपलब्ध राहत नाहीत़ विशेष म्हणजे, या ठिकाणी येणाºया रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी संबंधित डॉक्टर आपल्याच खाजगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देतात़ अशाप्रकारे शासकीय रुग्णालयातील रुग्णांचीही या डॉक्टरांकडून पळवापळवी केली जाते़ नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यापूर्वी अशी अनेक प्रकरणे घडली आहेत़ परंतु, त्यावरही प्रशासनाकडून खंबीर भूमिका घेण्यात आली नाही़
डॉक्टरांच्या खाजगी सेवेवर ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:32 AM
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना खाजगी सेवा करावयाची असल्यास त्यांनी व्यवसायरोध भत्ता स्वीकारु नये असे शासनाचे आदेश आहेत़ परंतु, खाजगी सेवा किंवा व्यवसायरोध भत्ता यापैकी कुठलाही विकल्प न निवडता अनेक अध्यापक सर्रासपणे शासनाकडून मिळणारा व्यवसायरोध भत्ता घेतात़ विशेष म्हणजे, रुग्णालयाच्या वेळेत अध्यापक, तज्ज्ञ डॉक्टरांकडून खाजगीत सेवा देण्यात येते़ अशा डॉक्टर, अध्यापकांची आता वैद्यकीय शिक्षण विभागाने माहिती मागवली आहे़ त्यामुळे खाजगीत सेवा देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़
ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविद्यालय : शासनाने मागवली अधिष्ठातांकडून माहिती