नांदेड: शहराला विष्णुपुरी प्रकल्प आणि आसना नदीतून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी आसना नदीतील पाणी लवकर संपते. त्यामुळे संपूर्ण शहर आणि सांगवी, पावडेवाडी, सिडको, हडको, बळीरामपूर, जुने नांदेड यांसह जवळपासच्या बहुतांश खेड्यांची मदार विष्णुपुरी प्रकल्पावर आहे. मात्र, नांदेड महापालिकेचे पाणी वाटपाचे योग्य नियोजन नसल्याने नांदेडकरांच्या उशाला धरण असूनही दोन दिवसाआड पाणी मिळते.
एप्रिलमध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे थंड पाण्याच्या जारची मागणी वाढली आहे. साधा जार १० रुपये, तर थंड २० किंवा २५ रूपयांना मिळतो. मध्यम कुटुंबाला एका दिवसात २ जार लागत असल्याने महिन्यात जारवर १,२०० रुपये खर्च होतोय.
प्रत्येक घरी नळ, पण पाणी नाहीशहरातील कानाकोपऱ्यात पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्चून पाईपलाईन टाकली गेली आहे. परंतु, अनेक भागात अंतर्गत रस्त्यांनी ट्यूब लेव्हल न काढल्यामुळे नळ असूनही पाणी येत नाही. काही भागात मोटारी लावून नळाचे पाणी घ्यावे लागते. तरोडा, गोविंदनगर, वाडी, काबरानगर भागात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे.
दोन दिवसाआड पाणी, नळ काय कामाचे?शहराच्या उशाला तुडुंब भरलेले धरण असतना केवळ महापालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना दोन दिवसाआड पाणी मिळते. त्यातही अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला तर मोटारी न लागल्याने त्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे नळ असून काय उपयोग, असा सवाल नागरिक करतात.
नांदेडात उन्हाळ्यात टॅंकर व्यवसाय कोटींच्या घरातमहापालिका व शहरानजीक असलेल्या ग्रामपंचायतींकडे नियोजनाचा अभाव. विष्णुपुरी प्रकल्प असतानाही एप्रिल, मे आणि जून महिन्यात पाणीटंचाई. या टंचाईतून खासगी टँकर लाॅबी सक्रिय, नागरिकांची गरज ओळखून बेभाव टँकर उन्हाळ्यात नांदेड शहर, परिसरात टँकरच्या व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल
प्रशासनाचा पाण्यावर महिन्याचा खर्च किती?महापालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आरओ मशीन बसविले आहे. परंतु, अनेक कार्यालयात जार घेतले जातात. सांडपाण्यासाठीही टँकरचे पाणी घेतले जाते. परंतु, सदर टँकर मनपाचे असल्याने पैसे लागत नाहीत. परंतु, पिण्याच्या पाण्यावर लाखोंचा खर्च होत आहे. वाडी ग्रामपंचायती अंतर्गत लोकमित्रनगर परिसरात वास्तव्यास असून, पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने महिन्याला चार हजार रुपये टँकरवर खर्च होताे.
भाग्यगनर, बाबानगर, टिळकनगरातही टंचाईशहरातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या भाग्यनगर, बाबानगर, टिळकनगरातही अनेकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
टाकी, मोटार अन् टँकरवर हजारोंचा खर्चवाढत्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यात बोअरचे पाणी गेल्याने अनेकांना स्टोरेजकरिता टाकी, नळाला मोटार घ्यावी लागली.