लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी अर्धवट राहिलेल्या पाणीपुरवठा योजना, औषधांची कमतरता, निधीच्या खर्चासह कोलमडलेल्या नियोजनांच्या मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी प्रशासनाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये गोंधळ असल्याचे निदर्शनास आले आहे.जि.प. अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी जि.प. सदस्य पूनम पवार यांनी गडगा येथील अर्धवट पाणीपुरवठा योजना ३१ मार्चपर्यंत पूर्ण करणे, रेबिज इंजेक्शनचा पुरवठा करणे, पंचायत समिती विभागाच्या वतीने कागदपत्रांमध्ये होत असलेला गोंधळ आदी मुद्दे उपस्थित केले. तसेच गडगा येथील पाणीपुरवठा योजना मागील काही वर्षांपासून अर्धवट राहिली असल्याने येथील नागरिकांना पाणी संकटाचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. दरम्यान, एक कोटी रूपयांची ही योजना असून सदर कामावर आतापर्यंत ६५ लाख रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर उर्वरीत ३५ लाख रूपये ३१ मार्चपर्यंत खर्च करून सदरची योजना पूर्ण करण्याच्या सूचना जि.प. सदस्या पवार यांनी यावेळी दिल्या.त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर रेबिजच्या इंजेक्शनचा पुरवठा केला जात असल्याचा दावा जि. प. च्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या वतीने केला गेला. परंतु, सद्य:स्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना रेबिजचे इंजेक्शन घेण्यासाठी खाजगी रूग्णालयात जावे लागत असल्याचे सांगत यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याची मागणी पवार यांनी यावेळी केली.तसेच राष्टÑीय पेजयल योजनेंतर्गत पंचायत समितींना ५० हजार रूपयांचे बांधकाम करण्यास मंजुरी देण्याचा अधिकार आहे. परंतु, संपूर्ण योजना या जवळपास एक करोड रूपयांच्या असल्यामुळे पंचायत समितीच्या वतीने दाखल करण्यात आलेले प्रस्तावांचा काही उपयोग राहत नसल्याची माहिती पवार यांनी दिली. दरम्यान, जि. प. सदस्य बेळगे यांनी दलित वस्ती योजनेच्या निधीचे नियोजन करण्याची मागणी केली. परंतु, समाजकल्याण अधिकारी बैठकीस उपस्थित नसल्याने या मुद्यावर चर्चा होऊ शकली नाही.तसेच बैठकीत दक्षिण व उत्तर विभागाच्या वतीने करण्यात येणाºया कामांची विभागाच्या वतीने आढावा घेणे व शाळांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात यावे, या मुद्यावर चर्चा करण्यात आली.बैठकीस जि. प. चे उपाध्यक्ष समाधान जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, सभापती माधव मिसाळे, दत्तात्रय रेड्डी, शीला निखाते, मधुमती कुटूंरकर, जि.प. सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, अॅड. विजय धोंडगे, सुशीला बेटमोगरेकर आदींची उपस्थिती होती.
पाणी, औषधांचा मुद्दा गाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:24 AM
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी अर्धवट राहिलेल्या पाणीपुरवठा योजना, औषधांची कमतरता, निधीच्या खर्चासह कोलमडलेल्या नियोजनांच्या मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी प्रशासनाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये गोंधळ असल्याचे निदर्शनास आले आहे.
ठळक मुद्देस्थायी समिती बैठक : सादर केलेल्या कागदपत्रांमधील गोंधळ उघडकीस