नांदेड : आठ दिवसांपासून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे़ दिवसभर अंगाला चटके देणाऱ्या उन्हामुळे पाणीपातळीत लक्षणीय घट झाली आहे़ नांदेड शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून बोअर, विहिरींचे पाणी पूर्णपणे आटले आहे़ त्यातच विष्णूपुरीसह जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे़नांदेड जिल्ह्यात दोन मोठे प्रकल्प असून त्यापैकी विष्णूपुरी प्रकल्पावर नांदेड शहरासह परिसरातील गावांची तहान अवलंबून आहे़ सदर प्रकल्पात आजघडीला केवळ १७.५३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे़ त्याचबरोबर इसापूर प्रकल्पातून आसना नदीत सोडलेले पाणीदेखील आटल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ तसेच नांदेड शहरातील तरोडा, बाबानगर, टिळकनगर, आनंदनगर आदी भागातील पाणीपातळीत घट झाल्याने बोअरचे पाणी गेले़ त्यामुळे नागरिकांना नळाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे़नांदेड शहरासह जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़ बारुळच्या मानार प्रकल्पावर चार तालुक्यांतील बहुतांश गावे अवलंबून आहेत़ सदर प्रकल्पात १९.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.नांदेड जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थिती पाहता अनेक गावांमध्ये आज प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यात आले आहेत़ परंतु, काही गावांची मागणी असूनदेखील त्यांना गावात असलेल्या नळयोजनांमुळे टँकर उपलब्ध होवू शकत नाही़ बऱ्याच गावांत नळयोजना असूनही त्या आजपर्यंत सुरूच झालेल्या नाहीत़जिल्ह्यातील प्रकल्पातील दिवसेंदिवस घटणारी पाणीपातळी आणि वाढत्या उन्हाचा पारा लक्षात घेवून प्रशासनाकडून पाणीटंचाई निवारणाबरोबरच चा-याची व्यवस्था करण्याची गरज आहे़नांदेड जिल्ह्यातील मागील आठ दिवसांपासून तापमान ४२ अशांच्या वर राहिल्याने पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण वाढले आहे़नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाºया कै. शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला केवळ १७.५ तर बारुळ मानार प्रकल्पात १९.४८ टक्के पाणीसाठा आहे़ तर देगलूर तालुक्यातील करडखेड १.९०, कंधार तालुक्यातील पेठवडज ०.८२, किनवट तालुक्यातील नागझरी प्रकल्पात २.२४, लोणी ३.५७, डोंगरगाव १.१७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे.टंचाई : तीन मध्यम तर ४१ लघु प्रकल्प कोरडेठाकनांदेड जिल्ह्यात एकूण ९ मध्यम प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ यामध्ये मुखेड तालुक्यातील कुंद्राळा, कंधार तालुक्यातील महालिंगी, लोहा तालुक्यातील उर्ध्व मानार प्रकल्पांचा समावेश आहे़ तर जिल्ह्यातील एकूण ८८ लघु प्रकल्पांपैकी ४१ लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत.त्याचबरोबर लोहा, कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, उमरी, मुदखेड, भोकर, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर आदी तालुक्यांतील उर्वरित लघु प्रकल्पांच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाली़ त्यामुळे येणाºया काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़
प्रकल्पातील पाणी पातळीत मोठी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 12:20 AM
आठ दिवसांपासून उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे़ दिवसभर अंगाला चटके देणाऱ्या उन्हामुळे पाणीपातळीत लक्षणीय घट झाली आहे़
ठळक मुद्देपाणी जपून वापरा : विष्णूपुरीत १७ तर मानारमध्ये १९ टक्के पाणी