नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातून आजघडीला अडीच हजार विद्युत पंपांद्वारे पाण्याचा उपसा सुरू असून यामध्ये १ हजारांहून अधिक विद्युत पंप अनधिकृत आहेत. प्रकल्पातील जलसाठा प्रतिदिन ०.७५ दलघमी कमी होत आहे. याच वेगात पाणी उपसा राहिल्यास फेब्रुवारीमध्येच विष्णूपुरी कोरडे पडणार आहे.शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पावर नांदेड शहराची पिण्याच्या पाण्याची मदार आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे पहिल्यांदाच पिण्याच्या पाण्यासाठी नांदेडला २७ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले होते. मात्र यामध्ये ३ दलघमीची वाढ करुन हे आरक्षण ३० दलघमी इतके झाले. यावर्षी दुष्काळाची परिस्थिती आहे. जुलै २०१९ पर्यंत नांदेड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा संतुलित व पुरेशा प्रमाणात होण्याच्या दृष्टिकोणातून प्रकल्पातील साठा संरक्षित करण्याची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात होत असलेला पाणी उपसा लक्षात घेवून पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत अवैध पाणी उपसा रोखण्याची विनंती केली. विष्णूपुरी जलाशयातून प्रतिदिन ०.६० ते ०.७५ दलघमी या वेगाने पाणी कमी होत आहे. हा उपसा असाच सुरू राहिला तर फेब्रुवारीमध्येच पाणी संपणार आहे. त्यामुळे आरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी भविष्यात अडचणी निर्माण होणार आहेत. ही बाब गंभीर असून अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकाने प्रभावी कारवाई केली नसल्याचेही स्पष्ट केले आहे.विष्णूपुरी प्रकल्पक्षेत्रात गोदावरी नदीपात्रात उजव्या बाजूला १२०६ विद्युत पंप आहेत. त्यात ६९१ पंप परवानाधारक आहेत तर ५१५ पंप अनधिकृत आहेत. त्याचवेळी नदीपात्राच्या डाव्या बाजूला १ हजार २९३ पंप आहेत. त्यात ७७१ पंपांना परवानगी आहे. तर ५२२ पंप हे अनधिकृत आहेत. पथकामार्फत कडक कार्यवाहीची गरज असून यामध्ये महावितरणचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना बागायतदारांची यादी पाठवून त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी कळवले होते.मात्र कार्यवाही झालीच नाही. अनधिकृत बागायतदारांचा वीजपुरवठा पूर्णपणे तोडण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी १३ नोव्हेंबर रोजी बैठक घेवून संबंधितांना आदेश देताना अनधिकृत विद्युतपंप तात्काळ काढण्याचे आदेश दिले. १६ नोव्हेंबरपासून राज्य विद्युत वितरण कंपनीने नांदेड व परभणीकडून सर्व पंपांचा विद्युत पुरवठा तोडावा, ज्याद्वारे पाणी उपसा थांबू शकेल.पर्यायी पाणीपुरवठा योजनाही मर्यादितच- आयुक्तशहरासाठी महापालिकेने इसापूर प्रकल्पावर आधारित सांगवी येथील बंधाºयावर पर्यायी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. इसापूर प्रकल्पातून पाणी घेवून शहराला पाणीपुरवठा करणेही वास्तवात शक्य नाही. सांगवी बंधाºयाची क्षमता तसेच पंपगृहाची क्षमता लक्षात घेता काही भागालाच येथून पाणीपुरवठा केला जावू शकतो. त्यामुळे इसापूरहून पाणी घ्यावे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातील शेतकºयांनीही प्रकल्पातील पाणी हे प्राधान्याने पिण्यासाठी असते, ही बाब लक्षात घ्यावी. मानवी भावना लक्षात घेवून नांदेडकरांची तहान भागवण्यासाठी पाणी शिल्लक रहावे यासाठी विष्णूपुरीतील पाण्याचा अवैध उपसा थांबवावा, असे आवाहनही आयुक्त माळी यांनी केले.
अडीच हजार वीजपंपांद्वारे पाणी उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:59 PM
प्रकल्पातील जलसाठा प्रतिदिन ०.७५ दलघमी कमी होत आहे. याच वेगात पाणी उपसा राहिल्यास फेब्रुवारीमध्येच विष्णूपुरी कोरडे पडणार आहे.
ठळक मुद्देविष्णूपुरी गाठणार तळ १ हजार ३७ विद्युत पंप अनधिकृत, बेसुमार उपसा सुरुच