लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : येणाऱ्या काळात जिल्ह्यातील काही गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळेच जिल्ह्यातील विविध पाटबंधारे प्रकल्पातील १५ आॅगस्टपर्यंत पुरेल इतके पाणी शहरी व ग्रामीण भागातील पिण्यासाठी आरक्षित करण्यात आल्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा कालावधी लक्षात घेऊन पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पाणी आरक्षणाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस आ. डी. पी. सावंत, आ. सुभाष साबणे, आ. अमर राजूरकर, आ. हेमंत पाटील, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ. वसंत चव्हाण, आ. डॉ. तुषार राठोड, आ. विक्रम काळे, आ. प्रदीप नाईक, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार आदींसह अधिकाºयांची उपस्थिती होती.पिण्याच्या पाण्याला संपूर्ण जिल्ह्यातील प्रकल्पातील जलाशयामध्ये सर्वोच्च प्राधान्य राहील असेही पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. विविध जलाशयातील उपलब्ध पाणीसाठा आणि शहरी व नागरी भागासाठीची संबंधित यंत्रणांची मागणी लक्षात घेऊन पाणी आरक्षणाचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.प्रारंभी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील पाणीसाठ्याची माहिती देऊन शहरी व ग्रामीण भागासाठी पाण्याची यंत्रणांनी केलेली मागणी आदींची माहिती दिली. अवैध पाणी उपशावर नियंत्रणासाठी समित्या गठित केल्या असून कार्यवाही सुरु असल्याचे सांगून जिल्हाधिकाºयांनी थकीत पाणीपट्टी भरण्याबाबत जिल्हा परिषदेला सूचना केली. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेच्या शहरी लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देवून अंमलबजावणी प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला.असे आहे प्रकल्पनिहाय पाणी आरक्षणमहानगरपालिका नांदेडसाठी विष्णूपुरी प्रकल्पात ३० दलघमी आणि उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात १५ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले. याशिवाय जिल्हा परिषद नांदेडसाठी विष्णूपुरी प्रकल्पात २ दलघमी आणि उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात ३५ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आला. याशिवाय विष्णूपुरी प्रकल्पात १.५० दलघमी पाणी एमआयडीसी नांदेडसाठी ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील विविध नगरपालिका व ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेच्या मागणीप्रमाणे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतील पाणी आरक्षित करण्यात आले. उर्ध्व पैनगंगा, निम्नमानार बारुळ, विष्णूपुरी, पूर्णा, देवापूर या मोठ्या प्रकल्पांत एकूण ९३.१० दलघमी आणि उर्ध्व मानार लिंबोटी निम्नमानार बारुळ, कुंद्राळा, करडखेड, नागरझरी, कुदळा, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्र. ४, बाभळी बंधारा या मध्यम प्रकल्पातील १८.८० दलघमी पाणीसाठा आरक्षित करण्यात आला तसेच पलाईगुडा, शेख फरिदवदरा, रेणापूर सुधा, सुनेगाव व उर्ध्व मानार लिंबोटी या लघु प्रकल्पांत ४.८० दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले असल्याचे पालकमंत्री कदम यांनी जाहीर केले.
नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:05 AM
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : येणाऱ्या काळात जिल्ह्यातील काही गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळेच जिल्ह्यातील विविध ...
ठळक मुद्देजिल्ह्याच्या टंचाई निवारणास प्राधान्य ; १५ आॅगस्टपर्यंतचे नियोजननांदेडसाठी विष्णूपुरी प्रकल्पात ३० दलघमी आणि उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात १५ दलघमी पाणी आरक्षित