रोहिपिंपळगाव येथे डीपी बंद
मुदखेड : तालुक्यातील रोहिपिंपळगाव येथे गावठाण जवळील डीपी बंद होती, तर दुसऱ्या ठिकाणी डीपी सुरू असल्याने वाद झाला. दुसरी डीपी कशी काय सुरू आहे, असा सवाल वीज वितरणचे कर्मचारी श्रीराम गुरुकुले यांना विचारण्यात आला. त्यावेळी वाद निर्माण होऊन एका गटाने डीपीवरच दगड फेकले. मुदखेड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
किनवटमध्ये जोरदार पाऊस
किनवट : किनवट शहर व परिसरात २ मे रोजी जोरदार पाऊस झाला. वादळवाऱ्यामुळे काही ठिकाणी आंब्यासह झाडांची पडझड झाली, भुईमुगाची काढणी सुरू असताना, पाऊस आल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
दिगंबर पाटील यांना पदक
भोकर : येथील पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील उत्कृष्ट कामाबद्दल पोलीस महासंचालक पदक देऊन गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे स्वरूप आहे. याबद्दल पाटील यांचे अनेकांनी स्वागत केले.
भोसीकर सेवानिवृत्त
कंधार : पोखरभोसी येथील मूळचे तथा चंद्रपूर येथील नवोदय विद्यालयाचे प्राचार्य भीमराव भोसीकर सेवानिवृत्त झाले. त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. सेवानिवृत्तीबद्दल अनेकांनी भोसीकर यांना शुभेच्छा दिल्या.
रामभाऊ चन्नावार यांना अभिवादन
लोहा : शिवसेनेचे ज्येष्ठ रामभाऊ चन्नावार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष दिनेश तेललवार, हरिभाऊ चव्हाण, उपनगराध्यक्ष शरद पवार, छत्रपती धुतमल, शिवसेनेचे बाळासाहेब कऱ्हाळे, प्रा.बी.एम. पवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव कटकमवार, भाजपचे करीमभाई शेख, नगरसेवक दत्ता वाले, नगरसेवक भास्कर पाटील, रत्नाकर महाबळे, गिरीश कन्नावार, शिवाजी पांचाळ उपस्थित होते.
शहापूर येथे रक्तदान शिबिर
देगलूर : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहापूर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात १०१ जणांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे, यामध्ये १० महिलांचा समावेश आहे. शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक भगवानराव धबडगे यांच्या हस्ते झाले. शिबिरासाठी मल्लरेड्डी यालावार, गणेश रेड्डी चामावार, किशन पाटील, अविनाश चिंतलवार, अभिजीत नल्लावार, पवनरेड्डी शुरकंटे, नागेश पाटील, मंजुळा सुरावार, प्रदीप देशमुख, सचिन गायकवाड, माधव शहापूरकर आदींनी परिश्रम घेतले.