लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडणारा तालुका म्हणून माहूरची ओळख आहे, परंतु गतवर्षात तालुक्यात अत्यल्प म्हणजे केवळ ५०१़७५ मि़मी़ पाऊस झाला. परिणामी तालुक्याची जलवाहिनी असलेली पैनगंगा नदी डिसेंबर महिन्यामध्येच कोरडीठाक पडल्याने तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे़ तर तालुक्यातील अनेक गावे, वाडी, तांडे येथील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे़एरव्ही तालुक्यात सरासरी १२०० मि़मी़ पावसाची नोंद होत होती़ तर गतवर्षी तालुक्यात अत्यल्प ५०१़७५ मि़मी़ पाऊस पडला़ तालुक्यात मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत शेततळी, मातीनाला बांध यासारखी अनेक कामे अंदाजपत्रकानुसार न करता नको त्याच ठिकाणी केल्याने पावसाळ्यात अल्प प्रमाणात पडलेले पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून गेले. त्यामुळे फेब्रुवारीपासूनच तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे़ तालुक्यात एकूण ६२ ग्रामपंचायती आहेत़ तर ६२ ग्रामपंचायतीअंतर्गत ९२ गावांचा समावेश असून त्यापैकी मांडवा व वसरामनाईक तांडा या दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे़मुरली गटग्रामपंचायतीमधील नखेगाव येथे तीव्र पाणीटंचाई असल्याने येथील विहीर अधिग्रहण प्रस्ताव सादर केला असून प्रस्तावास ग्रामपंचायत संबंधित विस्तार अधिकाºयांचा पंचनामा अप्राप्त असल्याने नखेगाव येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़१५ गावांतील विहिरींचे अधिग्रहणवायफनी, रुई, रुपानाईक तांडा, दिगडी कु़, कळसिंग तांडा, तोळातांडा, पानोळा, मांडवा, वसराम नाईक तांडा, जिवलानाईक तांडा, हिवळणी, पवनाळा, वाई, जगुनाईक तांडा,सतीगुडा या १५ गावांतील विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे़ तर दिघडी, पानोळा, सावरखेड या तीन गावांना बोअर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला आहे़ तालुक्यातील अन्य ग्रामीण भागात पाणीटंचाईने नागरिकांचे हाल होत आहेत़
पाणीटंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:36 AM
लोकमत न्यूज नेटवर्क श्रीक्षेत्र माहूर : नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडणारा तालुका म्हणून माहूरची ओळख आहे, परंतु गतवर्षात ...
ठळक मुद्देमाहूर तालुका : गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने पैनगंगा नदी कोरडीठाक