नांदेड : गतवर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी भविष्यात पाणीटंचाईचे संकट जिल्ह्यावर कोसळणार अशी स्थिती जलसाठ्यावरून दिसत आहे़ नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांत एकूण ३९़३६ टक्के जलसाठा असून शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात सर्वाधिक ५१़४९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़नांदेड जिल्ह्यात मृग नक्षत्रावर चांगला पाऊस झाला़ त्यानंतर अनेकवेळा उघडीप देवून अधूनमधून बरसणाºया पावसाने जिल्ह्यातील बहुतांश जलसाठ्यातील पाणीपातळी झपाट्याने वाढली़ परंतु, परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली़ त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत गेली़सोयाबीन, मूग आणि उडीद पावसाच्या पाण्यावर येणारी पिके असूनही यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने विहिरी, बोअरमधील पाणी द्यावे लागले़ परिणामी यंदा पाणीपातळीतही मोठी घट झाली.़ फेब्रुवारी, मार्चपर्यंत ज्या विहिरींचे पाणी संपत नाही, अशा विहिरींनी डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच तळ गाठला आहे़ त्यामुळे रबी पिकांना शेवटपर्यंत पाणी मिळेल की नाही, या चिंतेने बळीराजा ग्रासला आहे़आजघडीला मुखेड, किनवटसह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत़ जिल्ह्यात एकूण १०७ प्रकल्प आहेत़ यामध्ये मोठे दोन, मध्यम आणि लघू प्रकल्पांचा समावेश असून ८१९़९५ दलघमी प्रकल्पाची साठवणक्षमता आहे़ परंतु, यंदा पावसाच्या लहरीपणामुळे विष्णूपुरी वगळता एकही प्रकल्प पूर्णपणे भरला नाही़ आजघडीला सर्वाधिक ५१़४९ टक्के जलसाठा विष्णूपुरीमध्ये आहे़ त्याखालोखाल मानार प्रकल्पामध्ये ४७़१३ दलघमी जलसाठा उपलब्ध असून त्याची टक्केवारी ३४़१० टक्के आहे़ त्याचबरोबर जिल्ह्यात एकूण ९ मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये आजघडीला ३२़०९ टक्के, ४ उच्च पातळी बंधाºयांमध्ये ३७़६६ टक्के, ८८ लघु प्रकल्पामध्ये ४६़१९ टक्के आणि ४ कोल्हापुरी बंधाºयांमध्ये २़२१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे़विष्णूपुरी प्रकल्पामध्ये गतवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ७६ टक्के जलसाठा उपलब्ध होता़ यंदा त्यात घट झाली असून आजघडीला ५१ टक्केच पाणी उपलब्ध आहे़ यंदा २५ टक्केंनी पाणी कमी असल्याने पाणीप्रश्न उद्भवणार हे निश्चित आहे़ तर ग्रामीण भागातही भविष्यात पाणीटंचाईची समस्या चिंतेचा विषय आहे़ सदर परिस्थितीवर प्रशासनाला आजपासूनच नियोजन करणे गरजेचे असून ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध जलसाठ्यांमध्ये पाणी आरक्षित करून ठेवण्याची गरज आहे़विष्णूपुरी : सर्वाधिक ५१़४९ टक्के जलसाठाआजघडीला सर्वाधिक ५१़४९ टक्के जलसाठा विष्णूपुरीमध्ये आहे़ त्याखालोखाल मानार प्रकल्पामध्ये ४७़१३ दलघमी जलसाठा उपलब्ध असून त्याची टक्केवारी ३४़१० टक्के आहे़ त्याचबरोबर जिल्ह्यात एकूण ९ मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये आजघडीला ३२़०९ टक्के, ४ उच्च पातळी बंधाºयांमध्ये ३७़६६ टक्के, ८८ लघू प्रकल्पांमध्ये ४६़१९ टक्के आणि ४ कोल्हापुरी बंधाºयांमध्ये २़२१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे़ ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविणे कठीण आहे़ उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेवून पाणी आरक्षित करणे गरजेचे आहे़
नांदेड जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 1:09 AM
नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांत एकूण ३९़३६ टक्के जलसाठा असून शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात सर्वाधिक ५१़४९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे़
ठळक मुद्देजनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर