कंधार : लिंबोटी येथील विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. लिंबोटीचे पाणी शहरात येत नसल्याने पुन्हा पाण्याचा ठणठणाट झाला आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांचा घसा कोरडा पडला असून जलकुंभसुद्धा तहानलेले असल्याचे विदारक चित्र शहरात निर्माण झाले आहे.शहराला पाणीटंचाईच्या विळख्यातून बाहेर काढावे यासाठी सुजल निर्मल अभियान योजनेतंर्गत शहरासाठी पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर झाली. २५ कोटी ६७ लाख ७२ हजार किमतीची योजना पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांचा कालावधी होता. योजनेची कामे पूर्ण करताना नानाविध कारणे येत राहिली. त्यामुळे योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. योजना पूर्ण करून शहराला मुबलक पाणीपुरवठा केला जाईल असे वारंवार कित्येक महिन्यांपासून पालिकेकडून सांगितले जात आहे. परंतु त्याला मूर्तरूप आले नाही.शहरातील नागरिकांना गत काही वर्षांत दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. बारमाही शहर पाणी संकटाचा सामना करत आहे. याकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांना पाणी टंचाईतून बाहेर काढायला हवे. मात्र तसे होऊ शकले नाही. तारीख पे तारीख दिली जात आहे. आणि पाणीटंचाईचा प्रश्र लटकला असल्याचे चित्र आहे.मानार नदीपात्र आज कोरडे पडले. त्यामुळे पर्यायी व्यवस्था पालिकेने करीत लिंबोटी येथे २२.५० (साडेबावीस एच.पी.) च्या दोन मोटारीच्या सहाय्याने शहरात पाणी आणून नागरिकांची तहान भागविली जात असताना निसर्गाच्या अवकृपेने वादळी वारा व पावसाचा फटका बसला. आणि दोन्ही मोटारीत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला. तीन दिवस शहरात निर्जळी झाली. सामान्य नागरिक पाणी समस्येने हतबल झाले़ सामान्य नागरिकांची तारांबळ अन् मध्यमवर्गीय टँकरने पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न करत राहिले. मोटारीचा तांत्रिक दोष दूर करून पाणी पुरवठा एकदाचा सुरळीत केला. परंतु पुन्हा २० एप्रिल रोजी विद्युत पुरवठ्यात तांत्रिक दोष निर्माण झाला. शहराचा पाणीपुरवठा त्यामुळे पुन्हा विस्कळीत झाला आणि बऱ्याच भागातील नागरिकांना याचा फटका बसला. योजना तातडीने कार्यान्वित करून ९० एच.पी.च्या विद्युत मोटारीचा वापर करून शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पालिकेने प्रयत्न तात्काळ करावेत असा नागरिकांचा सूर उमटत आहे. यात टँकरला ‘अच्छे दिन’ आले असून टँकरची मागणी वाढत असल्याचे चित्र आहे.मानार नदीपात्र कोरडेठाकमानार नदीपात्र जलसाठ्या- अभावी कोरडे पडले. त्यामुळे पर्यायी व्यवस्था पालिकेने करीत लिंबोटी येथे २२.५० (साडेबावीस एच.पी.) च्या दोन मोटारीच्या सहाय्याने शहरात पाणी आणून नागरिकांची तहान भागविली जात असताना निसर्गाच्या अवकृपेने वादळी वारा व पावसाचा फटका बसला. आणि दोन्ही मोटारीत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला. तीन दिवस शहरात निर्जळी झाली. लिंबोटी येथे न.प.कर्मचारी पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.पाणीपुरवठा विस्कळीत२० एप्रिल रोजी विद्युत पुरवठ्यात तांत्रिक दोष निर्माण झाला. शहराचा पाणीपुरवठा त्यामुळे पुन्हा विस्कळीत झाला आणि बºयाच भागातील नागरिकांना याचा फटका बसला. योजना तातडीने कार्यान्वित करून ९० एच.पी.च्या विद्युत मोटारीचा वापर करून शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पालिकेने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे़पाणीपुरवठा योजनेची कामे अर्धवटशहरासाठी पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर झाली. २५ कोटी ६७ लाख ७२ हजार किमतीची योजना पूर्ण करण्यासाठी ३६ महिन्यांचा कालावधी होता. योजनेची कामे पूर्ण करताना नानाविध कारणे येत राहिली. त्यामुळे योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. योजना पूर्ण करून शहराला मुबलक पाणीपुरवठा केला जाईल, असे वारंवार कित्येक महिन्यांपासून पालिकेकडून सांगितले जात आहे.
कंधार शहरात पाण्याचा ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:11 AM
लिंबोटी येथील विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. लिंबोटीचे पाणी शहरात येत नसल्याने पुन्हा पाण्याचा ठणठणाट झाला आहे.
ठळक मुद्देपाणीटंचाई तीव्रजलकुंभच पाण्याअभावी तहानलेलेनागरिकांचा घसा कोरडाठाक