सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर एक नव्हे तर एकावर एक दोन मास्क लावलेल्या व्यक्ती दिसू लागल्या आहेत. मास्कमुळे कोरोनाच्या प्रसारावर काही प्रमाणात नियंत्रण येत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे डबल मास्क वापरा, कोरोना टाळा, अशी म्हण पुढे आली आहे. एक सर्जिकल मास्क आणि त्यावर एक कापडी मास्क वापरता येईल. किंवा एकावर एक दोन कापडी मास्कही वापरणे योग्य आहे. गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित अंतर राखणे कठीण असताना दुहेरी मास्क वापरणे योग्य आहे. दुहेरी मास्क सुरक्षित असल्यामुळे नागरिकांनी त्यांचा वापर करणे गरजचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
चौकट- मास्क कसा वापरावा?
कोरोनाची लक्षणे बदलली आहेत. दुसऱ्या लाटेत कोरोना अधिक आक्रमक झाला आहे. त्यामुळे दुहेरी मास्क हा योग्य पर्याय आहे. एका सर्जिकल मास्कवर कापडी मास्क वापरावा. जाड कापडाचे मास्कही सुरक्षित आहेत, मात्र त्यावर एक मास्क लावल्यास अधिक सुरक्षितता राहते. एन- ९५ मास्क वापरणे अधिक चांगले. - डॉ. प्रमोद अंबाळकर, नांदेड
चौकट- दोन फुटांचे अंतर; हात स्वच्छ धुणे गरजेचे
- कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे मास्कचा वापर, दोन फुटांचे अंतर आणि हात स्वच्छ धुणे या तीन सोप्या सवयींचा अवलंब करण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. प्रत्येकाने डबल मास्क लावायला सुरुवात केली तर कोरोनाचा संसर्ग जवळपास ९५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत आपण बाजार, बसस्थानक किंवा सार्वजनिक वाहतूक यासारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रवास करत असलाे तर दुहेरी मास्क वापरावा. यासाठी सर्जिकल मास्कवर कपड्याचा मास्क किंवा कपडाचे दोन मास्क एकाच वेळी वापरला जाऊ शकतो.