नांदेड : शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर या निर्णयाचे नांदेडात जल्लोषात स्वागत करण्यात आले. दुपारनंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आनंदोत्सव आणि अभिवादन करण्यासाठी सकल मराठा समाज तसेच विविध संघटनांनी गर्दी केली.गुरुवारी दुपारी मराठा आरक्षणा संदर्भात न्यायालयाच्या निर्णयाला शिक्षण आणि नोकरीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय न्यायालयाने वैध ठरविला.आरक्षणा विरोधातल्या सर्व याचिका फेटाळून लावत मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. आरक्षणासाठी राज्यात मराठा समाजाने मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाला यश मिळाल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. त्याचवेळी आरक्षणासाठी बलीदान दिलेल्या ४२ मराठा समाज बांधवांसह कोपर्डीच्या ताईला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मराठा सकल समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळयासमोर फटाके वाजवून आणि मिठाई वाटप करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. संजय कदम, तानाजी हुसेकर, राजेश मोरे, श्याम पाटील वडजे, सुनील पुयड, चंद्रकांत पाटील, सुनील पाटील, कृष्णा मंगनाळे, सुचिता जोगदंड, सुनीता शिंदे, नलावडेताई, अमोल नलवाडे, राज सरकार, सुनील कदम, तिरुपती भगनुरे, सदा पुयड, राजेश हंबर्डे, अनिल जाधव, गजू शिंदे, मनोज मोरे, पांडुरंग मोरे, कल्याण शिंदे, अविनाश खडकेकर, सुधाकर देशमुख, गजानन बागल आदी समाज बांधव उपस्थित होते.माहूरात आनंदोत्सवश्रीक्षेत्र माहूर : मराठा आरक्षणासंदर्भात २७ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय दिल्याचे वृत्त धडकताच माहूर येथे मराठा समाजाच्या संघटनांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करून एकमेकाने पेढे, मिठाई भरवत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी १६ टक्क्यावरून १२ ते १३ टक्क्यावरच आणले असून न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने १६ टक्केपर्यंत आरक्षण मराठा समाजाला द्यावे अशी अपेक्षा विखे पाटील कृषी परिषदेचे विदर्भ संपर्क प्रमुख ज्ञानेश्वर चौधरी पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिगांबर जगताप, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर क-हाळे, जयकुमार अडकीने, डॉ.अभिजित कदम, अॅड.श्याम गावंडे पाटील, अमोल केशवे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विशाल शिंदे, छावा संघटनेचे अमोल शिंदे, विर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे तालुकाध्यक्ष मंगेश जाधव, निखील शिंदे, सुनील पाटील हडसनीकर, अमोल जाधव, विखे पाटील कृषी परिषदेचे तालुकाध्यक्ष शिवशंकर थोटे, श्रीकांत शिंदे, जयकांत मोरे आदी उपस्थित होते.बिलोलीत जल्लोषबिलोली : न्यायालयाने मराठा आरक्षण कायम ठेवले़ त्यामुळे शंकरनगर येथे मराठा समाजाच्या वतीने जो मावळे बलिदान दिलेत त्यांना प्रथमत: दोन मिनिट श्रद्धांजली वाहण्यात आली़ फटाकडे वाजून व पेढे वाटून एक मराठा लाख मराठा म्हणत जल्लोष करण्यात आला़ यावेळी जिल्हाध्यक्ष हणमंत पाटील वाडेकर, प्राचार्य शेळके, हाळदे, शेटकर, धोंडजी पाटील देगलुरे, जगदिश पाटील वाडेकर, आनंद पाटील देगलुरे, शुकूमार भोसले, गजानन काटेवाडे, ज्ञानेश्र्वर तोडे, राजेश देगलुरे उपस्थित होते़ नांदेड तालुक्यातील निळा, महिपाल पिंपरी येथे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला़ यावेळी नंदू जोगदंड, गिरधारी पाटील जोगदंड आदी उपस्थित होते़मराठा समाजाने एकजुटीने काढलेल्या ५८ मोर्चांचे फलितआज मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबतीत निकाल देताना मराठा समाजाच्या बाजूने निकाल दिला. आरक्षणासाठी ४२ तरुणांनी आपला जीव अर्पण केलाय. समाजाने शांततेत ५८ मोर्चे काढले. हा लढा समाजाचा होता. समाजानेच लढला व समाजानेच जिंकला. यापुढेही हा लढा केंद्रात आरक्षण लागू होईपर्यंत समाजच लढवणार आहे. त् यासाठी जगभरातील मराठा जसा एकत्र आला तसाच यापुढेही एकत्र राहून लढत रहावे लागणार आहे. वीस-पंचवीस वषार्पासून घरादारावर तुळशीपत्र ठेवून आरक्षणाच्या लढ्याची वात सातत्याने तेवत ठेवणाऱ्या त्या सर्व मराठा बांधवांना तसेच पदरचे पैसे खर्च करून न्यायालयीन लढा देणाºया बांधवांना मानाचा मुजरा़ -संतोष गव्हाणे, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी आघाडी, संभाजी ब्रिगेड़
मराठा आरक्षणा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो मराठा समाज मागास असल्याचा आयोगाच्या निर्णयावर केलेला शिक्कामोर्तब आहे. मराठा समाजातील गोरगरीब, सामाजिक, शैक्षणिक, दृष्टीने वंचित मराठा बांधवाना न्याय मिळाला आहे त्याचा मला खूप आनंद झाला. मराठा बांधवांच्या मोठ्या संघषार्नंतर ही लढाई जिंकली आहे़ - प्राचार्य डॉ़ पंजाब चव्हाण, मराठा सेवा संघ, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र प्रदेश.मराठा आरक्षण मुले समाजातील युवकांचे बरेच प्रश्न मार्गी लगतील. मराठा आरक्षणचे सर्व श्रेय हे ४२ युवकांचे बलिदान, सामाजिक संघटनाचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच रस्त्यावर उतरलेले दोन कोटी सामान्य सामान्य जनतेला जाते़ -इंजि़ तानाजी हुस्सेकर, नांदेड़मराठा सेवा संघाच्या ३५ वर्षाच्या लढ्याला खºया अर्थाने आज यश प्राप्त झाले असून आरक्षणाच्या या लढ्यात शेकडो तरूणानी बलीदान दिलेले आहे याचं निश्चितच दु:ख असेल.- रमेश पवार, मराठा सेवा संघ़