नांदेड : बिदर (कर्नाटक ) येथील गुरुद्वारा नानकझीरा साहेब येथून श्री गुरु नानकदेवजी यांच्या 550 व्या जन्मोत्सव कार्यक्रमाचे संदेश प्रसारित करण्यासाठी काढण्यात आलेल्या जागृती यात्रेचे नांदेड शहरात स्वागत झाले. तत्पूर्वी रविवारी ( दि. 2 ) यात्रेचे नांदेड शहरात आगमन झाले होते.
सोमवारी (दि. 3) तखत सचखंड हजूरसाहेबचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, मीत जत्थेदार संतबाबा ज्योतिंदरसिंघजी, हेड ग्रंथि भाई कश्मीर सिंघजी, मीत ग्रंथि भाई अवतारसिंघजी शीतल, धूपिया भाई रामसिंघजी यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रा अमरावतीकडे रवाना झाली आहे. सकाळी 7.30 वाजता गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहेब येथून विशेष पालकी वाहनातून यात्रा प्रारम्भ झाली. पालकी वाहनात श्री गुरु ग्रंथसाहेबांचे स्वरुप प्रकाशमान करण्यात आले होते. ग्रंथि म्हणुन भाई ठाकुरसिंघजी बिदर आणि मनमीतसिंघ यांची नियुक्ति आहे.
यात्रे सोबत गुरुद्वारा नानकझीरा ट्रस्टचे अध्यक्ष सरदार बलबीर सिंघ, उपाध्यक्ष गुरचरण सिंघ घड़ीसाज, सचिव बलवंत सिंघ गाडीवाले, सदस्य मनप्रीत सिंघ, कमल सिंघ सह सदस्य सहभागी झाले आहेत. तसेच दहा वाहन भरून भाविक यात्रेत सहभागी आहेत. गुरुद्वारा श्री लंगर साहेबचे संतबाबा नरिंदर सिंघजी कारसेवा वाले आणि संतबाबा बलविंदर सिंघजी कारसेवावाले यांनी यात्रा नियोजनात भरपूर सहकार्य केले आहे. ही यात्रा देशातील १९ राज्यात गुरु नानक देवजी यांचे संदेश प्रसारित करणार आहे. यात्रेचे नांदेड आगमन आणि येथून अमरावतीकडे पाठवण्यासाठी गुरुद्वारा सचखंड बोर्डातर्फे यात्रेचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. गुरुद्वाराचे आजी माजी सदस्यांनी यात्रेचे सत्कार केले. बोर्ड अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा, प्रशासकिय अधिकारी डी. पी. सिंघ, रणजीत सिंघ चिरागिया, ठान सिंघ बुंगई, हरजीत सिंघ कडेवाले, नारायणसिंग नम्बरदार, रविंदर सिंघ कपूर, जितेंदर सिंघ जवान यांनी सहकार्य केले.
शहरात जागो जागी यात्रेचे स्वागत सत्कार करण्यात आले. ट्रांसपोर्ट संघटनेचे अध्यक्ष सुखविंदर सिंह हुंदल, इन्दरसिंघ शाहू, बिल्लू सिंघ रंगी आणि अन्य सदस्य उपस्थित होते. तसेच नवज्योत फॉउण्डेशनचे अध्यक्ष नौनिहालसिंघ जहागिरदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बड़पुरा येथे प्रसाद आणि चहाचे वितरण केले. अनेक ठिकाणी आरती आणि प्रसाद वितरण झाले.