शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

पेसा क्षेत्रातील शाळा डिजिटल कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:06 AM

पेसायुक्त गावातील शाळा डिजिटल करण्यासाठी थेट ग्र्रामपंचायतला राज्यपालांमार्फत निधी मिळाला असूनही गेल्या अनेक वर्षांपासून माहूर तालुक्यातील मदनापूर-करळगाव येथील जि.प.प्रा.शाळा डिजिटल होऊ शकली नाही.

ठळक मुद्देराज्यपाल यांच्याकडून निधी मिळूनही मदनापूर- करळगावची जि़प़ शाळा दुर्लक्षित

नितेश बनसोडे ।श्रीक्षेत्र माहूर : पेसायुक्त गावातील शाळा डिजिटल करण्यासाठी थेट ग्र्रामपंचायतला राज्यपालांमार्फत निधी मिळाला असूनही गेल्या अनेक वर्षांपासून माहूर तालुक्यातील मदनापूर-करळगाव येथील जि.प.प्रा.शाळा डिजिटल होऊ शकली नाही. मदनापूर- करळगाव या पेसा क्षेत्रातील शाळा डिजिटल कधी होणार? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.सन २०१४-१५ पासून पेसा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्वरूपाचा निधी ‘पेसा’ क्षेत्र असलेल्या ग्रा.पं.ला शासनामार्फत येत असतो. मात्र आलेल्या निधीचा वापर करण्याची जबाबदारी असणारे झारीतील शुक्राचार्य या निधीचा योग्य वापर करत नसल्याने अविकसित आदिवासीप्रवण भागातील नागरिकांना शासनाच्या विशेष सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे.मदनापूर- करळगावची जि.प. प्राथमिक शाळा डिजिटल करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपूर्वी शासनाकडून स्थानिक ग्रा.पं.ला निधी प्राप्त झाला. मात्र, तत्कालीन ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे डिजिटल शाळेच्या कोणत्याही कामास सुरुवात केली नाही. सदर निधीतून शाळेला प्रोजेक्टर, संगणक संच खरेदी करणे व शाळेच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व विविध बोलकी शैक्षणिक चित्रे भिंतीवर काढणे व विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण देणे, आदी कामे करावी लागतात. मात्र, प्रत्यक्ष असे कोणतेही काम या पेसायुक्त ग्रा.पं.अंतर्गत मदनापूर-करळगावच्या शाळेत दिसून येत नाही.त्यामुळे शासन जरी उद्दात हेतूने आदिवासी भागातील नागरिकांना जगाच्या स्पर्धेत आणण्यासाठी निधी देत असले तरी स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेने आदिवासीबहुल भागातील विद्यार्थी सुविधांपासून कोसोदूर राहत असल्याचे चित्र आहे.पाच महिन्यांपूर्वी मदनापूर ग्रा.प.ची सार्वत्रिक निवडणूक झाली असून नवे कारभारी निवडून आले. त्यामुळे आता नव्या कारभाºयाकडून तरी शाळा डिजिटल करून मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. मात्र अद्यापतरी डिजिटल शाळा झाली नसल्याने गावकऱ्यांच्या अपेक्षांचा भंग झाला आहे. नव्या ग्रा. पं. पदाधिकाºयांनी मदनापूर- करळगावचे डिजिटल शाळेचे अडकून पडलेले काम मार्गी लावावे, अशी अपेक्षा शिक्षणप्रेमी नागरिक व्यक्त करीत आहेत. माहूर पं.स.चे विस्तार अधिकारी शरद तेलतुंबडे यांच्याशी संपर्क साधला असता दोन - चार दिवसांत शाळांना भेटी देऊ असे सांगितले आहे. असे असले तरी आजतागायत ग्रामस्थांनी याबाबत त्यांना अनेकवेळा अवगत केले असतानाही त्यांनी का दखल घेतली नाही? हा यक्षप्रश्न मात्र कायम आहे.दरम्यान, मागील तीन वर्षांपासून शासनाकडून ग्रामपंचायतीला निधी प्राप्त होवूनही शाळा डिजिटल होवू शकली नाही़ संगणक संच खरेदी, शाळेच्या भिंतीची रंगरंगोटी, चित्रे आदी कोणतीच कामे अद्याप करण्यात आली नाही़ त्यामुळे पालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे़

आदिवासी भागातील विद्यार्थी सुविधांपासून वंचितमदनापूर जि़ प़ शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र चारोडे व करळगावच्या मुख्याध्यापिका डी.सी.पडोळे यांना विचारणा केली असता डिजिटल खोलीचे अपूर्ण साहित्य देण्यात येत असल्यामुळे आम्ही ते स्वीकारले नसल्याचे सांगितले. मला मदनापूर ग्रा.पं.ला रुजू होऊन एक महिनाच झाला असून ग्रा.पं. कार्यालयात मागील रेकॉर्डच उपलब्ध नाही. - शरद लाडेकर, ग्रामसेवक मदनापूऱ

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाfundsनिधी