शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत कधी धावणार? प्रवाशांना प्रतीक्षा, लोकप्रतिनिधी चिडीचूप

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: August 10, 2024 7:04 PM

नांदेड, परभणी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधीही चिडीचूप

नांदेड : वंदे भारत एक्स्प्रेस ही भारतीय रेल्वेची एक अर्धद्रूतगती इलेक्ट्रिक मल्टीयुनिट रेल्वेसेवा आहे. ही रेल्वेगाडी सर्व सोयी-सुविधायुक्त असून, प्रवाशांसाठी आरामदायी आहे. वंदे भारत ही जालना ते मुंबई, अशी मागील एक वर्षापासून सुरू करण्यात आली असली, तरी अद्याप नांदेडला सुरू झालेली नाही. त्यामुळे ही गाडी नांदेडपर्यंत कधी धावणार? याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे.

सध्या नांदेड रेल्वेस्थानकावरून एक्स्प्रेस, पॅसेंजर अशा एकूण ९४ गाड्या धावतात. तर, नांदेड स्थानकावरून १७ रेल्वेगाड्या मुंबई, पुण्यासह अन्य शहरांत सुरू आहेत. परंतु, नांदेडहून सर्वात जास्त मुंबई, पुणे येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यासाठी जास्तीत जास्त रेल्वेगाड्यांची गरज आहे. पण, सध्या नांदेड येथून मुंबईसाठी राजाराणी, नंदीग्राम, देवगिरी, तपोवन व पनवेल या पाच गाड्या जातात, तर पुण्यासाठी व्हाया औरंगाबाद एक व व्हाया लातूर एक, अशा दोन गाड्या सोडण्यात येतात. परंतु, अनेकदा प्रवाशांची संख्या अधिक असल्याने रेल्वेमध्ये आरक्षित जागेवरही प्रवाशांची घुसखोरी होत असते. त्यामुळे आरक्षित सीट केलेल्या प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. वंदे भारत रेल्वेगाडी नांदेडपर्यंत धावल्यास परभणी, नांदेडकरांसाठी सोयीचे होणार आहे. तसेच ९ ते १० तासांच्या आत मुंबईला जाता येईल.

नांदेड-परळ गाडीची मागणीमुंबई स्थानकावर प्लॅटफार्मची कमतरता असल्याने नियमित गाड्यांपेक्षा प्रवाशांची मागणी असूनही अतिरिक्त गाडी सोडली जात नाही. त्यासाठी नांदेडहून परळ गाडीची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या परळ येथील वर्कशॉपच तोडले असून, त्याठिकाणी १० प्लॅटफॉर्मचे रेल्वेस्टेशन उभारले जात आहे. त्यासाठी नांदेडहून मुंबईला जाणा-या प्रवाशासाठी नांदड-परेल गाडी सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.

आरक्षित डब्यातील घुसखोरी थांबणारयापूर्वी रेल्वेगाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट संपल्यानंतर आरएसी आणि त्यानंतर वेटींग तिकीटही मोठ्या प्रमाणात काढण्यात येत होते. परंतु, आता रेल्वे विभागाने आरक्षण काढलेल्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी वेटींग लिस्ट १ जुलै २०२४ पासून कमी केली आहे. त्याचा परिणाम तिकीट काढल्यानंतर जास्त वेटींग राहत नसल्याने प्रवाशांचे तिकीट वेळीच कन्फर्म होण्यास मदत होणार आहे.

म्हणावा तसा पाठपुरावा होताना दिसत नाहीवंदे भारत रेल्वे नांदेडपर्यंत आणण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून म्हणावा तसा पाठपुरावा होताना दिसत नाही. त्यामुळे जालन्यापर्यंत आलेली वंदे भारत नांदेडपर्यंत कधी धावणार ? असा प्रश्नही प्रवासी विचारत आहेत.

टॅग्स :NandedनांदेडVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसparabhaniपरभणीrailwayरेल्वे