नांदेड । लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून १४ उमेदवार नशीब आजमावत असून त्यात काँग्रेसचे अशोकराव चव्हाण, भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रा़डॉ़यशपाल भिंगे आणि एसपी- बीएसपीचे समद हेदेखील रिंगणात आहेत. सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून ६ वाजता मतदान पूर्ण होईल. त्यासाठी मतदान प्रक्रियेतील सर्व कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत़ त्यांच्यासाठी एसटी बसेस आणि इतर वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती़नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सहा मतदान केंद्रे आदर्श मतदान केंदे्र करण्यात आली आहेत. यामध्ये भोकरमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (वाकड), नांदेड दक्षिण कामगार कल्याण मंडळ, लेबर कॉलनी, नांदेड, नांदेड दक्षिण कामगार कल्याण मंडळ, सिडको नवीन नांदेड, नायगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, नायगाव, देगलूर नगरपालिका (नवीन) देगलूर, मुखेड हुतात्मा स्मारक , मुखेड हे सहा केंदे्र आदर्श मतदार केंद्रे म्हणून तयार करण्यात आले आहेत. या मतदान केंद्रावर मतदारांना जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र रस्ता राहणार आहे. बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था असेल. तसेच गुलाबपुष्प देऊन नवमतदारांचे स्वागत केले जाणार आहे. या मतदान केंद्रावर चहापाणी, शरबत अशी आदर सत्कारासारखी व्यवस्था सखी आणि आदर्श या दोन्ही मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे.नांदेड दक्षिणमधील नेहरू इंग्लिश स्कूल, कलामंदिरमागे, नांदेड हे मतदान केंद्र दिव्यांग कर्मचारी चालवणार आहेत. केवळ ५४१ मतदार असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून उपलब्ध वेळेत मतदान प्रक्रियेबद्दल आवश्यक ते सहाय्य घेण्याच्या दृष्टीने या केंद्राची निवड करण्यात आली आहे.नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालू राहणार आहे. सायंकाळी ६ वाजेदरम्यान जे मतदार मतदान केंद्रावर उपस्थित असतील अशा मतदारांना नंबरचे कुपन देवून अशा मतदारांचे मतदान करुन घेण्यात येणार आहे.मतदारांसाठी २,७०९ व्हीव्हीपॅटलोकसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच २,७०९ (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाºयांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदामध्ये मतदाराला पावती दिसेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.मतदान केंद्रावर सीसीटीव्हीची नजरनांदेड लोकसभा निवडणुकीत २८८ मतदान केंद्रावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे़ ४६ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत़ वेबकास्टींगद्वारे थेट निवडणूक आयोगही या मतदान केंद्रातील हालचालींची नोंद घेवू शकणार आहे़
कोण आहेत उमेदवार?अशोकराव चव्हाण-काँग्रेसप्रताप चिखलीकर-भाजपायशपाल भिंगे-वंचित ब. आघाडीअब्दूल समद-स.पा.अब्दूल रईस अहेमद -----मोहन वाघमारे-बमुसुनील सोनसळे-बरिसोपाश्रीरंग कदम-अपक्षमनीष वडजे-अपक्षमाधवराव गायकवाड-अपक्षरणजित देशमुख-अपक्षशिवानंद देशमुख-अपक्षअशोक चव्हाण-अपक्षमहेश तळेगावकर-अपक्ष