नांदेड : शहरातील शारदानगर भागात प्रेमास नकार दिल्याने ( Murder over denying love ) तरुणाने खंजरने तरुणीचा गळा चिरला ( young woman killed by cutting throat) . रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर पलायनाच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी लगेच पकडले. ही घटना रविवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वैष्णवी संजयसिंह गौर (वय २५) ही तरुणी एम. कॉम झाल्यानंतर खासगी नोकरी करीत होती. तिची अन् आरोपी सुरेश देविदास शेंडगे (वय २६, रा. पांगरी, ता. नांदेड) या तरुणाची चार वर्षांपासून ओळख होती. दोघेही एकमेकांशी फोनवरून नेहमी बोलायचे तसेच भेटतही असत. शनिवारी सायंकाळी वैष्णवी ही मैत्रिणीसह एका कॅफेमध्ये बसलेली असताना आरोपी सुरेश शेंडगे हा त्या ठिकाणी आला. यावेळी मैत्रिणीसमोरच त्याने मला टाळत असल्याच्या कारणावरुन शिवीगाळ केली. त्यानंतर तो तिथून निघून गेला.
मला का टाळतेस म्हणून पुन्हा घातला वादरविवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास वैष्णवी एकटी घरी असताना तो आला. त्यापूर्वी त्याने फोनवरुन वैष्णवीशी संपर्क साधला होता. या ठिकाणी त्याने वैष्णवीला तुझ्यावर प्रेम करतो, मला का टाळतेस म्हणून पुन्हा वाद घातला. त्यानंतर रागाच्या भरात जवळील खंजरने वैष्णवीचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वैष्णवीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतरही आरोपी तिथेच थांबला होता. घटनेची माहिती मिळताच विमानतळचे पोनि. अनिरुद्ध काकडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असलेल्या आरोपी सुरेशला पकडण्यात आले. घटना समजल्यानंतर वैष्णवीची आई, वडील आणि भावाने हंबरडा फोडला होता. परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करीत होते. या प्रकरणात विमानतळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.