शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
2
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: उद्धव ठाकरेंनी संपूर्ण भारताची माफी मागायला हवी- किरीट सोमय्या
4
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
5
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
6
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
7
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
8
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
9
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...
10
Post Office Time Deposit: पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवलेत? करा फक्त १ काम, मिळेल मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम
11
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
12
'पाणी' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आदिनाथ म. कोठारे करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन
13
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
14
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
15
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
16
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
17
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
18
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
19
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
20
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन

पत्नी आणि मुलाचा विहीरीत फेकून खून; पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 6:36 PM

पतीने स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होऊन कृत्याची कबुली दिली़

अधार्पूर (जि़नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह एक वर्षाच्या मुलाला स्वत:च्या हाताने विहीरीत ढकलून दोघांचाही बळी घेतल्याची घटना अर्धापूर तालुक्यातील लहान येथे रविवारी रात्री घडली. या प्रकरणातील आरोपी पतीने स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होऊन कृत्याची कबुली दिली़ या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

अर्धापूर तालुक्यातील लहान येथे राजेश श्रीमंगले हा आपल्या कुटुंबासह राहत होते़ श्रीमंगले हे अर्धापूर येथील एका सलूनमध्ये कारागीर म्हणून काम करायचा. रविवारी रात्री ७ च्या सुमारास राजेश पत्नी अलका (वय २७), मुलगी रूपाली (वय ३) व एक वर्षाचा मुलगा रूपेश यांना घेऊन सासरवाडीकडून आपल्या गावी लहान येथे जाण्यासाठी निघाला. ते रात्री ८ वाजताच्या सुमारास अर्धापूर येथे पोहोचले. येथून लहानकडे जाताना नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रोडलगत ते थांबले़ त्यानंतर रोडलगत असलेल्या एका पडीक विहीरीजवळ नेऊन त्याने पत्नी अलका व मुलगा रूपेश या दोघांना विहीरीत ढकलून दिले़ यातच या दोघांचाही मृत्यू झाला

त्यानंतर चिमुकली रूपालीला सोबत घेऊन  तो लहान येथील स्वत:च्या घरी आला. तेथे मुलीला सोडून त्यांने अधार्पूर पोलीस ठाणे गाठले. आणि पोलिसांना पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा व मुलाचा खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सावळे हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :MurderखूनNandedनांदेडPoliceपोलिस