शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

रोजगाराच्या कामांना मिळणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:23 AM

रोजगार हमी योजनेची कामे मागणी केल्यानंतर तीन दिवसांत मंजूर केले जाणार असल्याने या कामांना गती मिळणार आहे़ सध्या ९४२ कामे सुरू असून १३ हजार ५१२ मजूर काम करत आहेत़ दरम्यान, २८ प्रकारच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याने मजुरांच्या संख्येत वाढत होणार आहे़

ठळक मुद्दे२८ प्रकारच्या कामांना मंजुरी रोजगार हमी योजनेच्या कामांना तीन दिवसांत मिळणार मंजुरी

नांदेड : रोजगार हमी योजनेची कामे मागणी केल्यानंतर तीन दिवसांत मंजूर केले जाणार असल्याने या कामांना गती मिळणार आहे़ सध्या ९४२ कामे सुरू असून १३ हजार ५१२ मजूर काम करत आहेत़ दरम्यान, २८ प्रकारच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याने मजुरांच्या संख्येत वाढत होणार आहे़जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत ग्रामपंचायती तसेच विविध यंत्रणेकडून कामे करवून घेतली जातात. या कामावर रोजगार उपलब्ध करुन दिला जातो. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत, असे बंधन असताना जिल्ह्यात २०१७-१८ पूर्वीची १८ हजार कामे अपूर्ण आहेत. दुष्काळाची छाया गडद होत असताना अनेक गावांतून मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत होते़ दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत़ दुष्काळाची स्थिती आणि त्याबाबतच्या उपाययोजनांवर शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत़ दरम्यान, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅडिओ ब्रिजच्या माध्यमातून दुष्काळी जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधला होता. त्यावेळी अनेकांनी रोजगार हमी योजनेच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लागत नसल्याची तक्रार केली होती. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांना तीन दिवसांत मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले़ या निर्णयामुळे जिल्ह्यातील रोजगाराच्या कामांना गती मिळणार आहे़दरम्यान, २०१२ पर्यंत जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू होती़ रोजगार हमी योजनेच्या कामामुळे नांदेड जिल्ह्याची राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली होती़ मात्र मागील दोन, तीन वर्षापासून रोजगार हमीचे कामे बंद असल्याने उन्हाळ्यात मजुरांचे मोठ्या प्रमाणावर परप्रांतात स्थलांतर होत आहेत़ गावात हाताला काम मिळत नसल्याने मजुरांनी यापूर्वीच तेलंगणा, आंध्र प्रदेश व मुंबई, पुण्यात स्थलांतर केले आहे़ उर्वरित मजूर रोजगार हमीच्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत़ त्यातही ज्यांच्याकडे जॉबकार्ड उपलब्ध आहे, अशांनाच कामे मिळतात़ सध्या २०६ रूपये मजुरीचे दर असून दुष्काळात तेवढाच आधार उपलब्ध असल्याचे मजूर सांगत आहे़जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या कामे व मजुरांची आकडेवारी पुढील प ्रप्रमाणे, किनवट तालुक्यात १६४ कामावर २ हजार ९३ मजूर, भोकर ता ८८ कामावर १ हजार ८२१, अधार्पूर ९१ कामावर १ हजार ३६३,लोहा ११५ कामावर १ हजार १५९, उमरी ७१ कामावर १ हजार ४१ मजूर कामावर आहेत. नव्या आदेशामुळे मजुरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़अनेक मजूर जॉबकार्डपासून वंचित

  • जिल्ह्यात अपूर्ण राहिलेल्या कामामध्ये १ हजार २५३ कामे कृषी विभागाचे आहेत. तर सामाजिक वनीकरण विभागाचे कामे ५४१, वनीकरण विभागाचे ३८९, रेशीम विभागाचे ४२२ कामे अर्धवट राहिले आहेत.
  • जिल्ह्यात अनेक मजुरांकडे जॉबकार्ड उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली आहे. ज्या मजुरांकडे जॉब कार्ड आहेत ते अद्ययावत करण्यात आले नाहीत.त्यामुळे मजूर कामापासून वंचित राहत आहेत़
  • जिल्ह्यात सध्या रोजगार हमीच्या कामांची कासवगती असली तरी संबंधित विभाग प्रमुखांना कामांना मंजुरी देण्याचे अधिकार देण्याता आल्याने कामांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे़
टॅग्स :NandedनांदेडEmployeeकर्मचारीNanded zpनांदेड जिल्हा परिषदNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड