गाडी चांगली असल्यास मिळणार फिटनेस सर्टिफिकेट
वाहनांची फिटनेस चाचणी आणि स्क्रॅपिंग अनुषंगाने नवे धोरण आणले आहे. योग्य वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट मिळणार आहे.
अवजड वाहनांची फिटनेस चाचणी १ एप्रिल २०२३ तर इतर वाहनांची फिटनेस चाचणी १ जून २०२४ पासून टप्प्या-टप्प्याने लागू होईल.
भंगारात दिल्यास मिळणारा लाभ
नवीन नियमाने वाहन स्क्रॅप करायला दिले तर वेगवेगळ्या सवलती दिल्या जाणार आहेत. त्या वाहनाचे १५ टक्के रक्कम मिळेल.
जुने वाहन भंगारात दिल्यास नवीन वाहन खरेदीवर ही कंपनीसह शासनाकडून करांसह किमतीतही सुट दिली जाणार आहे.
भंगारातील ९० हजार वाहने धावतात रस्त्यावर
पंधरा वर्षं जुनी सरकारी किंवा पीएसयुच्या मालकीची/आग, दंगल किंवा इतर आपत्तीत नुकसान झालेली / उत्पादकांनी डिफेक्टिव्ह म्हणजेच सदोष ठरवलेली/जप्त केलेली वाहने आपोआप (ऑटोमॅटिकली) भंगारात निघतील. नांदेड जिल्ह्यात जवळपास ९० हजार वाहने भंगारात निघू शकतात.
जिल्ह्यात अंमलबजावणी कधीपासून ?
शासनाकडून रोड सेफ्टी आणि प्रदूषण रोखण्याच्या अनुषंगाने जुनी वाहने स्क्रॅप करण्याचे नवीन धोरण आणले आहे. त्यानुसार डाटा संकलित करण्याचे काम सुरू आहे. परंतु, जिल्ह्यात अंमलबजावणी कधीपासून करायची तसेच दंडाचे स्वरूप आदीबाबत स्पष्ट गाईड लाईन आल्या नाहीत. त्या आल्या की नवीन नियमांची अंमलबजावणी होईल.
- अविनाश राऊत, आरटीओ, नांदेड.