शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त कॅनॉलमुळे चिंता वाढली, विष्णुपुरी आवर्तनाचा शेतकऱ्यांना होणार का फायदा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 17:42 IST

मागील पंधरा - वीस वर्षांपासून या कॅनॉलचे काम अर्धवट स्वरूपाचेच असून मुख्य कॅनॉलला जोडणाऱ्या चाऱ्या तर अजूनही बेवारसच आहेत.

नांदेड :  शंभर टक्के शेतजमीन पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने विष्णुपुरी प्रकल्पातून रब्बी पिकांसाठी पाण्याचे आवर्तने सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या प्रकल्पांतर्गत निर्माण करण्यात आलेले कॅनॉल व त्याला जोडण्यात आलेल्या चाऱ्या गवत, झुडुपांनी गच्च भरल्यामुळे सोडलेले पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचूच शकणार नाही. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पातून सोडणाऱ्या पाण्याचा आम्हाला काय फायदा? असा सूर कॅनाॅल परिसरातील शेतकऱ्यांतून निघत आहे.

नादेड जिल्ह्यातील नांदेड, लोहा, नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची बरीच शेती निसर्गावर अवलंबून आहे. नेहमीच नैसगिक आपत्तीच्या आहारी त्यांची पिके जाऊन मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना नियोजित व हक्काचे पाणी मिळावे ल शेतकरी सदन व्हावा, या उद्देशाने या तालुक्यातील परिसरामध्ये विष्णुपुरी प्रकल्पांतर्गत कॅनॉल निर्मिती करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांची लाखो एक्कर जमिनी गेल्या. त्याबदल्यात शेतकऱ्यांना मिळणारा मावेजाही तुटपुंज्या स्वरूपाचा होता. मात्र, शेतकरी पाण्यामुळे आपल्याला फायदा होईल, या आशेने हप्प राहिले. मागील पंधरा - वीस वर्षांपासून या कॅनॉलचे काम अर्धवट स्वरूपाचेच असून मुख्य कॅनॉलला जोडणाऱ्या चाऱ्या तर अजूनही बेवारसच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी तर मिळत नाहीच, उलट यामुळे कॅनॉल मध्ये व बाजूने गवत मादत आहे. त्यामुळे बाजूचे शेतकरी यावर गुरे चारण्यासाठी आणत आहेत व पिकांचेही नुकसान करीत आहेत. यातून अनेकदा भांडणाचे प्रकार घडत असून शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. या कॅनॉलची दुरुस्ती करून मगच पाणी सोडल्यास शेवटपर्यंच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल व पाणी वाया जाणार नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांतून होत आहे.

रब्बी पिकांसाठी आवर्तने सोडण्याचे झाले नियोजनमाजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी नुकतेच रब्बी पिकांसाठी विष्णुपुरी प्रकल्पातून आवर्तने सोडण्याचे जाहीर केले आहे. या पाण्याचा नांदेड, लोहा, नायगाव तालुक्यातील बऱ्याच खेड्यांना फायदा होणार आहे. मात्र, या कॅनॉलमध्ये गवत, झुडुपे वाढल्यामुळे पाणी शेवटपर्यंत जाण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच लोहा व नायगाव तालुक्यातील भागामध्ये या कॅनॉलल्या जोडलेल्या चाऱ्यांचे कामच झाले नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा होणार नाही. कॅनॉलची साफसफाई करून चाऱ्यांचे बांधकाम करावे व नंतरच पाणी सोडावे, असा सूर या परिसरातील शेतकऱ्यांतून निघत आहे.

जमीन पडीक राहत आहेमाझ्या शेतातून कॅनाल जाणार म्हणून वीस वर्षांपूर्वी जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले. यात माझी बरीच जमीन गेली. नंतर कॅनॉल खोदून सिमेंटचे आतून बांधकाम केले. मात्र, बाजूने जोडलेल्या चाऱ्यांचे कामच केले नाही. मागील दोन वर्षांपासून पाणी सोडत आहेत. मात्र, अर्धवट कामामुळे माझ्या शेतापर्यंत पाणीच पोहोचतच नाही. त्याचा परिसरातील शेतकऱ्यांनाही काही फायदा होत नसून हे पाणी मिळेल त्या मार्गाने नदीत जाऊन पडते. यामुळे जमीन पडिक राहात असून जनावरांचा त्रास मात्र वाढला आहे.- शेख मुकद्दर, शेतकरी

टॅग्स :vishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणीNandedनांदेडagricultureशेती