लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : स्त्रियांनी स्वत:ला ओळखून कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवावा़ महिलांना मिळालेल्या आरक्षणामुळे राजकारणात मिळत असलेल्या संधीचे सोने करावे़ राजकारण चांगले असून त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलून राजकारणाची समाजकार्याशी सांगड घालून कार्य करावे, असे प्रतिपादन शिवधर्म संसदेच्या सदस्या तथा माजी आ़रेखा खेडेकर यांनी केले़मराठा सेवा संघ प्रणीत जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या ‘सामाजिक व राजकीय चळवळीतील स्त्रिया अपेक्षा, अनुभव व सकारात्मक सूचना, उपाय’ या विषयावरील सत्राच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या़ मंचावर पुष्पा बोंडे, नगरसेविका जयश्री पावडे, प्रगती पाटील, ज्योती पवार आदींची उपस्थिती होती़खेडेकर म्हणाल्या, स्त्रियांनी दैनंदिन घडामोडीवर लक्ष ठेवून काम करणे काळाची गरज असून त्यासाठी वाचन, संवाद वाढविला पाहिजे़ आज राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला आहे़ परंतु, राजकारण चांगले असून त्या माध्यमातून शिक्षण, प्रशासन, सामाजिक अशा विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते़पुष्पा बोंडे म्हणाल्या, आजच्या स्त्रियांनी जिजाऊ, सावित्रीची प्रेरणा घेवून कार्य केले पाहिजे़ पूर्वीपेक्षा आज वेगवेगळ्या संधी उपलब्ध असून त्या ओळखून पुढे येण्याची गरज आहे़ पुढे त्यांनी लंडनमध्ये नोकरी करताना अन् परतल्यानंतर राजकारणात काम करताना आलेल्या कटू-गोड अनुभवाच्या आठवणींचा उलगडा केला़ राजकारणात विचार, आचार, संस्कृती, नैतिक बळ आणि स्वत:च्या नियमाने वागणाºया महिलांना उच्च पदापासून दूर ठेवल्या जाते, असे मत त्यांनी व्यक्त केले़ दरम्यान, ज्योती पवार, प्रगती पाटील आदींनी आपले अनुभव व्यक्त केले़ सूत्रसंचालन स्मिता गायकवाड तर सरस्वती धोपटे यांनी आभार मानले़ प्रदेशाध्यक्षा डॉ़ रेखा पाटील चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेखा रावणगावकर, पूनम पारसकर, माधुरी भदाने आदींची उपस्थिती होती़ यशस्वीतेसाठी वनिता देवसरकर, सत्यभामा जाधव, लताताई बारडकर, सारिका कदम, सुनीता शिंदे, राणी दळवी, अंजली मुजळगेकर, सुहासिनी देशमुख, मीनाताई नरवाडे, वर्षा देशमुख, ज्योती जाधव, वैशाली माने, ज्योती डांगे, संगीता चिंचाळकर, अरूणा जाधव, कविता आगलावे, ज्योती पाटील, सावित्रा जाधव, विद्या शिंदे, आशा पाटील, विशाखा ठाकरे आदींनी सहकार्य केले.पदाचा समाजासाठी उपयोग करावा - पावडेनगरसेविका जयश्री पावडे यांनी त्यांच्या पंधरा वर्षांच्या राजकीय वाटचालीतील अनुभव मांडले़ स्वत:ची प्रगती करताना समाजाला वेळ द्या, असे आवाहन त्यांनी केले़ आरक्षणामुळे स्त्रियांना राजकारणात संधी मिळत असून केवळ सह्याजीराव न बनता, स्त्रियांनी आपल्यातील कार्यकुशलता दाखवून त्या पदाचा समाजासाठी उपयोग करावा, असे आवाहन केले़
राजकारण अन् सामाजिक कार्याची सांगड घालून महिलांनी कार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:52 AM
स्त्रियांनी स्वत:ला ओळखून कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवावा़ महिलांना मिळालेल्या आरक्षणामुळे राजकारणात मिळत असलेल्या संधीचे सोने करावे़ राजकारण चांगले असून त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलून राजकारणाची समाजकार्याशी सांगड घालून कार्य करावे, असे प्रतिपादन शिवधर्म संसदेच्या सदस्या तथा माजी आ़रेखा खेडेकर यांनी केले़
ठळक मुद्देराष्ट्रीय अधिवेशन : माजी आ़रेखा खेडेकर यांचे प्रतिपादन