शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

महिलांना हवा हक्काचा वाटा! काँग्रेस महिला आघाडीची हायकमांडकडे १४ टक्के जागांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 1:52 PM

काँग्रेसला मिळालेल्या १०० जागांपैकी किमान १४ जागांवर महिलांना संधी द्यावी, असा आग्रह राज्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी दिल्ली दरबारी काँग्रेस हायकमांडकडे धरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड: विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याने आता उमेदवारी आणि जागा वाटपाच्या हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीमध्ये २८८ पैकी २६० जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. काँग्रेसला मिळालेल्या १०० जागांपैकी किमान १४ जागांवर महिलांना संधी द्यावी, असा आग्रह राज्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी दिल्ली दरबारी काँग्रेस हायकमांडकडे धरला आहे.

लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या अनुषंगाने मांडलेल्या विधेयकाला काँग्रेसने समर्थन दिलेले आहे. त्यामुळे काँग्रेस महिलांना संधी देईल, अशी अपेक्षा पदाधिकारी महिलांना आहे. त्यासाठी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्यासह प्रदेश उपाध्यक्षा विद्या पाटील-लातूर, उपाध्यक्षा डॉ. रेखा पाटील चव्हाण-नांदेड, उपाध्यक्षा प्रतिमा उके-उमरेड यांच्यासह काही जिल्हाध्यक्षा आणि पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत ठाण मांडून आहे. या शिष्टमंडळाने काँग्रेसचे महासचिव तथा वरिष्ठ निरीक्षक मुकुल वासनिक यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र काँग्रेस महिला आघाडीच्या कार्याचा लेखाजोखा सादर केला आहे. शिष्टमंडळ काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचीही भेट घेणार असल्याचे समजते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस