शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

Women's Day Special : स्मशानात आनंद शोधणाऱ्या जावा : पुष्पावती आणि शारदा पवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:28 PM

सरण आणि मरणाच्या सान्निध्यात फुलवला संसार

- श्रीनिवास भोसले

नांदेड : स्मशानभूमी म्हणजे भीतीचेच ठिकाण. तेथे आनंद आणि प्रसन्नता कशी फिरकणार? पण, ‘त्या दोघींनी’ स्मशानातही कुटुंबाला जगण्याचे बळ दिले. पुष्पावती आणि शारदा पवार. या दोघी जावा! सरण रचले. दफनविधीसाठी प्रसंगी खड्डाही खोदला. सरण आणि मरणाच्या सान्निध्यात या दोघींनी तब्बल ११ जणांचा संसार फुलविला. 

पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी मसनजोगी समाज मराठवाड्यात सर्वत्र वास्तव्यास आहे. नांदेडच्या सिडको येथील स्मशानभूमीतही मसनजोगी समाजातील पवार कुटुंब राहाते. मारोती आणि बालाजी हे दोन्ही भाऊ आणि त्यांची मुले असे एकूण ११ जणांचे हे कुटुंब़ पवार कुटुंबाकडे पाहिल्यानंतर त्यांची केविलवाणी आर्थिक स्थिती लगेच समोर येते. मात्र, या परिस्थितीतही कुटुंबाच्या उभारणीसाठी हे कुटुंब एकजुटीने लढतेय. या कुटुंबातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पडेल ते काम करतात़ सरणासाठी लागणारे लाकूड, साहित्य देण्यापासून ते प्रसंगी सरण रचण्याचे कामही या महिला अत्यंत धाडसाने करताना दिसतात. मूळचे नांदेड तालुक्यातील निळा येथील असलेले हे पवार कुटुंब मागील १९ वर्षांपासून या स्मशानभूमीत निरंतरपणे काम करीत आहे़ 

या कुटुंबातील तिन्ही महिला पुरुषांच्या अनुपस्थितीत सरणासाठी लागणारे लाकूड देणे, सरण रचणे आदी काम धाडसाने करतात़ सरण रचताना तसेच दफनविधीसाठी खड्डा खोदतानाही त्या कचरत नाहीत. कुटुंबातील पुरुष मंडळी बाहेर गेल्यानंतर निर्भीडपणे त्या लेकराबाळांचा सांभाळ करतात. पवार यांच्या कुटुंबातील तीन मुली आणि दोन मुले असे पाच जण शेजारच्याच एका खाजगी शाळेत जातात. या मुलांना शिकवून अधिकारी झालेले पाहायचे आहे, असे स्वप्न या दोघींनी उराशी बाळगले आहे. 

सरण, मरणाची भीती कसली?स्मशानभूमीत दोन सरणजाळ्या आहेत़ अनेक वेळा या दोन्ही ठिकाणी सरण जळत असते़ अशा परिस्थितीत जळत्या सरणाच्या उजेडात राहावे लागते. कुटुंबात पाच लेकरं आहेत़ जन्मापासूनच ती या स्मशानभूमीत असल्याने त्यांना सरण, मरण अथवा प्रेताची भीती वाटत नाही. या लेकरांना शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभं राहिलेलं पाहायचं आहे. त्यासाठीच माझी धडपड सुरू असल्याचे पुष्पावती मारोती पवार सांगतात.

दफनविधीचा खड्डा खोदायलाही मागेपुढे पाहत नाहीकाही महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी चार ते पाच जण लहान मुलाचा मृतदेह घेऊन स्मशानभूमीत आले़ लहान मूल असल्याने दफनविधी करायचा होता़ आमच्याकडील पुरुष मंडळी बाहेरगावी होती़ त्यामुळे स्वत: खड्डा खोदून त्या मुलाचा दफनविधी पूर्ण केला़ स्मशानभूमीत येणाऱ्या कोणत्याही मयताच्या नातेवाईकांना आम्ही लाकूड अथवा इतर विधीच्या पैशांसाठी तगादा लावत नाही़ त्यांच्याकडून स्वखुशीने मिळणाऱ्या भिक्षेमधूनच आमचा उदरनिर्वाह चालतो, असे शारदा बालाजी पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिलाNandedनांदेड