लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कष्टकरी वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा आंबेडकरवादी मिशनचा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर आदर्शवत असल्याचे गौरोद्गार तामिळनाडू येथील खा़शशिकला शीला यांनी काढले़ विशेषत: मिशनने प्रशासनिक निर्मितीत केलेले कार्य उल्लेखनीय असून अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना घडविणारे बहुदा हे देशातील एकमेव केंद्र असेल असेही खा़शीला यावेळी म्हणाल्या़सिडको येथील आंबेडकरवादी मिशनमधील स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते़ यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या़ कार्यक्रमाला शिमला विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ़बी़रामास्वामी यांच्यासह डॉ़ यशवंत चव्हाण, किडे पाटील, प्रशिक पडघणे, दत्ताहरी थोतरे, प्राचार्य अविनाश नाईक, जय भोसीकर, टोम्पे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी प्रास्ताविक केले़ वंचित घटकातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेचे द्वार खुले करण्यासाठी मिशनची उभारणी केल्याचे सांगत, या माध्यमातून विविध समाज घटकातील विद्यार्थी आज प्रशासकिय सेवेत सहभागी होत देशासाठी योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले़ डॉ़ बी़रामास्वामी आणि खा़डॉ़ शशिकला शीला यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ शिक्षण ही आजच्या काळात अत्यंत महत्वाची बाब आहे़ विशेषत: कष्टकरी, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठीचे योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक होते़ ही पोकळी आंबेडकरवादी मिशनने भरुन काढल्याचे सांगत़, संपूर्ण देशात अशा पद्धतीचे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात निस्पृह कार्य मला बघायला मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले़ दिल्ली येथील रामास्वामी समाजशाळा अकॅडमी भविष्यात मिशनसोबत कार्य करेल अशी ग्वाही देत दिल्ली येथील अल्पसंख्याक समुदायासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मोफत युपीएससी मार्गदर्शन वर्गाचा लाभ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन डॉ़बी़ रामास्वामी यांनी केले़ यावेळी त्यांनी सामान्य अध्ययन, समाजशाळा, निबंध लेखन, आदी बाबत मार्गदर्शन केले़
आंबेडकरवादी मिशनचे कार्य आदर्शवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 1:07 AM
कष्टकरी वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा आंबेडकरवादी मिशनचा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर आदर्शवत असल्याचे गौरोद्गार तामिळनाडू येथील खा़शशिकला शीला यांनी काढले़ विशेषत: मिशनने प्रशासनिक निर्मितीत केलेले कार्य उल्लेखनीय असून अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना घडविणारे बहुदा हे देशातील एकमेव केंद्र असेल असेही खा़शीला यावेळी म्हणाल्या़
ठळक मुद्देप्रशासनिक निर्मितीत उल्लेखनीय योगदानशशिकला शीला यांच्याकडून गौरवोद्गार