लोकमत न्यूज नेटवर्कदेगलूर : केंद्र शासन पुरस्कृत मेगा टुरिझम सर्किट योजनेअंतर्गत तालुक्यातील होट्टल सिद्धेश्वर मंदिर परिसरातील बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर यांच्याकडून कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग लातूर यांच्याकडे देण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांना दिले आहेत.होट्टलचे सरपंच शेषराव सूर्यवंशी व ग्रामस्थांनी सिद्धेश्वर मंदिर व परिसरातील बांधकाम कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग लातूर यांच्याकडे वर्ग करण्याची विनंती जिल्हाधिका-यांकडे केली होती. कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग लातूर यांनी सदरील काम त्यांच्याकडे हस्तांतरित केल्यास काम गुणवत्तापूर्ण व तातडीने पूर्ण करण्याची हमी १९ मार्च २०१८ च्या पत्रानुसार जिल्हाधिका-यांना दिली होती.होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर येथे विकसित करावयाच्या कामात झालेली दिरंगाई तसेच मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटनविषयक महत्त्व व सदरील कामाची संथगती पाहता हे काम कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर यांच्याकडून मुदतीत पूर्ण होण्याची शक्यता दिसून येत नाही, असा जिल्हाधिकाºयांनी ठपका ठेवून होट्टल येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार राष्ट्रीय महामार्ग लातूर यांच्याकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश २२ मार्च २०१८ रोजी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांना दिले आहेत.सध्या पाटील यांचे लक्ष बिलोली येथील कामाकडेच जास्त आहे. देगलूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय कार्यालय अस्तित्वात येवूनसुद्धा पंधरा-पंधरा दिवस कार्यालयात कोणताही अधिकारी येत नाही हे वास्तव आहे.जिल्हाधिकाºयांनी होट्टल ग्रामस्थांच्या मागणीनुसार सदरील बांधकाम कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग लातूर यांच्याकडे देण्याचे आदेश पारित केले आहेत. मात्र लातूर येथील राष्ट्रीय महामार्गात मोठ्या पदावरील कार्यरत एका अधिकाºयाचाच भाऊ होट्टल येथील बांधकाम पाहतो आहे. त्यामुळे होट्टल येथील बांधकाम गुणवत्तापूर्ण होईल की नाही? हे येणाºया काळात स्पष्ट होणार आहे.होट्टलसाठी ३ कोटी ४४ लाख रुपये मंजूरहोट्टल पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी ३ कोटी ४४ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.त्यापैकी १ कोटी ७२ लाख रुपये कार्यकारी अभियंता नांदेड यांच्याकडे वितरित करण्यात आले. कामाचे कंत्राट यश कन्स्ट्रक्शनला देण्यात आले तसेच २६ फेब्रुवारी २०१४ रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला. सदरील प्रकरणात जमिनीच्या मालकी हक्काबाबत वाद निर्माण झाला.खंडपीठात प्रकरण गेले,खंडपीठाने १६ मार्च २०१६ रोजी जमिनीचे प्रकरण खारीज केले. दरम्यानच्या काळात देगलूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय कार्यालय अस्तित्वात आल्याने होट्टल येथील बांधकाम सा.बा.देगलूरकडे वर्ग करण्यात आला.देगलूरच्या अभियंत्यांवर ठेवला ठपकाहोट्टलच्या बांधकामाबाबत सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यानी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या देखरेखीखाली होणाºया कोणत्याही कामात गुणवत्ता राहिली नाही. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या पावलावर पाऊल टाकण्याचे धोरण खात्याने अवलंबले आहे़कार्यकारी अभियंता शंकपाळे निलंबित झाल्याने अतिरिक्त पदभार तोटावाड यांच्याकडे आहे. उपअभियंता एस.एस.पाटील यांच्याकडे बिलोली येथील उपअभियंत्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला.
देगलूर तालुक्यातील होट्टल परिसराचे काम सार्वजनिक बांधकामकडून काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:34 AM
केंद्र शासन पुरस्कृत मेगा टुरिझम सर्किट योजनेअंतर्गत तालुक्यातील होट्टल सिद्धेश्वर मंदिर परिसरातील बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर यांच्याकडून कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग लातूर यांच्याकडे देण्यात यावेत असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांना दिले आहेत.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश