लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सिडको भागातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाची इंटरनेट सेवा मागील दोन दिवसांपासून बंद आहे़ त्यामुळे नवीन परवाना, परवाना नूतनीकरण, वाहनांची नोंदणी यासह खरेदी-विक्री, तपासणी आदी सर्व प्रकारची कामे खोळंबली आहेत़ दिवसभर कार्यालयात ठिय्या मांडल्यानंतरही काम न झाल्यामुळे त्यांना आल्यापावली परत जावे लागले़ त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाला जवळपास ५ लाखांचा महसूल कमी मिळाला़गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या वादळीवारा आणि पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद होती़ त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे खोळंबली होती़ रजिस्ट्री कार्यालय, शासकीय कार्यालय त्याचबरोबर आॅनलाईन करण्यात येणाऱ्या अनेक कामांना त्याचा फटका बसला़ महावितरणच्या झटक्याने अनेक भागात तर पंधरा-वीस तास वीजपुरवठा खंडित होता़ अनेक कार्यालयांतील इंटरनेट सेवा अद्यापही सुरळीत झाली नाही़ त्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयालाही त्याचा फटका बसला़या ठिकाणी दररोज नवीन परवाने काढण्यासाठी वाहनचालक येतात़ त्यांच्या परीक्षाही आॅनलाईन घेण्यात येतात़ त्याचबरोबर वाहनांची नोंदणी, परवाना नूतनीकरण, खरेदी-विक्री, वाहनांचा कर, दंड, रोड टॅक्स, ग्रीन टॅक्स यासह अनेक कामे या ठिकाणी आॅनलाईनच करण्यात येतात़ यातून प्रादेशिक परिवहन विभागाला दिवसाकाठी जवळपास दहा लाखांचा महसूल मिळतो़परंतु सोमवारपासून इंटरनेट सेवाच बंद असल्यामुळे कामे ठप्प झाली आहेत़ सोमवारी आलेले नागरिक दिवसभर कार्यालयात ठिय्या देवून होते़ त्यानंतर त्यांना मंगळवारी येण्यास सांगितले़ परंतु, सलग दुसºया दिवशीही इंटरनेट सेवा सुरळीत झाली नव्हती़ त्यामुळे सायंकाळपर्यंत ताटकळत बसलेल्या नागरिकांना दुसºया दिवशीही आल्यापावली माघारी परतावे लागले़ आता बुधवारी इंटरनेट सेवा सुरळीत होईल, असे कार्यालयातून सांगण्यात आले आहे़---याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रभारी कार्यालय अधीक्षक राजेश गाजूलवार म्हणाले, आरटीओ कार्यालयात इंटरनेट सेवेच्या दोन लाईन आहेत़ त्यातील १० एमबीपीएसची लाईन ही दोन दिवसांपासून बंद आहे़ तर २ एमबीपीएसची लाईन सुरु आहे़ सुरु असलेल्या लाईनवर केवळ अतिशय महत्त्वाची कामेच करण्यात येत आहेत़ एकच लाईन सुरु असल्यामुळे कामे संथगतीने होत आहेत़
नांदेड आरटीओ कार्यालयाचे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:44 AM
पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद होती़ त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे खोळंबली होती़ रजिस्ट्री कार्यालय, शासकीय कार्यालय त्याचबरोबर आॅनलाईन करण्यात येणाऱ्या अनेक कामांना त्याचा फटका बसला़ महावितरणच्या झटक्याने अनेक भागात तर पंधरा-वीस तास वीजपुरवठा खंडित होता़ अनेक कार्यालयांतील इंटरनेट सेवा अद्यापही सुरळीत झाली नाही़ त्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयालाही त्याचा फटका बसला़
ठळक मुद्देइंटरनेट सेवा बंद : दोन दिवसांपासून नागरिक खोळंबले