हिमायतनगर : आंदेगाव येथील पाणीपुरवठा योजना पाच वर्षांपासून अर्धवट काम पूर्ण करून देण्याची गावक-र्यांची मागणी नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथील गावाची पाणी टंचाई लक्षात घेऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेसाठी जवळपास १ कोटी २० लाख रुपयांची नळ योजना मंजूर झाली होती. सदरील योजनेचे काम गुत्तेदारांने जि.प.पाणी पुरवठा विभागाअंतर्गत सुरु केले होते. या कामाला पाच वर्षांचा कालावधी होत आहे. परंतु अद्यापपर्यंत काम अर्धवट स्थितीत आहे.
सदरील योजनेचे काम २०१५ पासून ठप्प असल्याने अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कुचकामी ठरली आहे. ग्रामस्थांना उन्हात पाणी टंचाई काळात इतरत्र भटकावे लागत आहे.
सदरील पाणीपुरवठा योजनेचे काम गुत्तेदारानी पाच पर्षांपूर्वी सुरुवात केली होती. यात पाणी साठवण एका टाकीचे व विहिरीचे काम पूर्ण झाले आहे आणि एक टाकी अर्धवट अवस्थेत असून पाईप लाइन बरोबर टाकली नाही असे जवळपास ५० टक्के काम अर्धवट स्थितीत आहे. उर्वरीत कामे लवकर सुरू करण्यात यावे या संदर्भात गावक-र्यांनी अनेक वेळा निवेदन देऊन मागणी केली होती तरी कामाला आजपर्यंत सुरूवात झाली नाही. यासंबंधीत अधिकारी व गुत्तेदाराशी पाणीपुरवठा योजनेचे काम का बंद पडले अशी विचारना केली असता ते नेहमी उडवाउडवीचे उत्तर देऊन वेळ मारून नेत असल्याचे गावातील दयानंद थोटे यांनी सांगितले.
रखडलेली योजना लवकरात लवकर सुरु करावी अन्यथा आम्हा ग्रामस्थांना लोकशाही मार्गाचा वापर करून आंदोलन करणार असल्याचे गावातील जेष्ठ नागरिक माधवराव थोटे, पोलीस पाटील निळकंठे, माजी सरपंच दत्ता लक्ष्मण गटकवाड, सेवानिवृत्त फौजी, चिमणाजी थोटे, दया थोटे, लक्ष्मण बड्डेवाड, रामदास पोलसवाड यांनी सांगितले.