लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : तालुक्यातील १९६ पैकी २०० शाळांना पावसाची झळ बसली असून पाण्याची थेंब थेंब गळती होत आहे़ तर आजघडीला ४० शाळा निजामकालीन इमारतीमध्येच भरत आहेत.तालुक्यातील १९६ शाळांपैकी आजघडीला १०० शाळा गळक्या आहेत़ यापैकी ५० शाळा आरसीसी बांधकाम झालेल्या आहेत़ तरीपण त्या गळतात़ ४०-४५ शाळा पत्राच्याच आहेत़ त्या पत्राची चाळणी झाली. मोठा पाऊस वा वादळ सुटले की त्या गळतात़ अथवा पत्राचा मोठा आवाज येतो़ त्यामुळे शिक्षकासह विद्यार्थी जीव मुठीत घेवून शिक्षण घेतात़ करमोडी, उमरी (जहांगीर), ठाकरवाडी, बरडशेवाळा, बामणी, मासाईतांडा, चोरंबा खु़, चोरंबा बु़, गारगोटी, पोतली (तांडा), पांगरी, चेंडकापूर, सिबदरा, मनाठा, विठ्ठलवाडी, रावणगाव, पांगरी (ता़), आष्टी मुलींचे हायस्कूल हदगाव, तामसा, ल्याहरी अशा एक ना अनेक शाळा, नेवरी, नेवरवाडी, तालंग, उंचाडा येथील शाळा गळक्या असून मैदानात पाणी साचते़पाऊस उघडला की, गुरुजी विद्यार्थ्यांना व्हरांड्यात घेवून बसतात़ शाळा गळकी, इमारत मोडकळीस आलेली, त्यामुळे सतत मनात भीती असते़इमारत ढासळली तर त्यामुळे एकाच वर्गात दोन-तीन वर्गाचे विद्यार्थी एकत्र बसून धडे गिरवतात़दरम्यान, जिल्ह्यात नायगाव तालुक्यातील गडगा येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेची इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहे. याच जून्या इमारतीच्या प्रांगणात विद्यार्थी खेळतात़ त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. तरीदेखील संबंधित विभाग झोपेत आहे़उर्दू शाळेची वर्गखोली कोसळलीबहाद्दरपुरा परिसरातील कोटबाजार येथील जि़प़ वरिष्ठ प्रा़उर्दू शाळेची वर्गखोली १५ ते १६ आॅगस्टदरम्यान झालेल्या पावसात पडली़ या शाळेत एकूण ७ वर्गखोल्या आहेत़ यापैकी दोन खोल्या कार्यालय व संगणक रुमसाठी आहे़ तर ५ खोल्यामध्ये १ ली ते ७ वी पर्यंतची शाळा भरवली जाते़ शाळेची विद्यार्थीसंख्या २०७ आहे व १०० टक्के उपस्थिती आहे़ भीजपावसामुळे १६ तारखेला रात्री ही खोली पडली़ या खोलीचे बांधकाम १९९५ मध्ये झाले होते़ मागील वर्षापासून या वर्गखोलीच्या भिंतीला भेगा पडल्या होत्या़
हदगाव तालुक्यातील १०० शाळांची बिकट अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:47 AM