नांदेड : जागतिक योग दिवस नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला़ ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयात योग दिनानिमित्त भल्या पहाटेच योगा करण्यात आला़ त्यामध्ये चिमुकले विद्यार्थीही उत्साहाने सहभागी झाले होते़उमरी : येथील गोरठेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या व क्रिडा विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने योगशिक्षक के. वाय. रॅपनवाड यांच्या मार्गदर्शनाखाली योग साधना केली.यावेळी रॅपनवाड यांनी विविध योगासने - प्राणायाम यांची प्रात्यक्षिके दाखवली. तसेच निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्वही त्यांनी सांगितले. प्रत्येकाने आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी नियमित योगा करावा, असे आवाहनही केले. सूत्रसंचलन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ़अशोक जाधव यांनी केले. प्रास्ताविक क्रीडा संचालक प्रा.डॉ.बी.एच. इंगळे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.एस.एस. गाढे यांनी मानले. जि.प. प्रा. केंद्रीय प्राथमिक शाळा ढोलउमरी येथे शिक्षक बेळीकर यांनी योगासने करून दाखवली. सहशिक्षक सयद फय्याजुद्दीन, रमेश हनवते, मधुकर पवार उपस्थित होते़किनवट : तालुक्यातील प्रधानसांगवी केंद्राअंतर्गत विविध उपक्रमांनी परिचित असलेली जि़प़प्रा़शाळा दरसांगवी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला़सकाळी सहा ते साडेसात या वेळात योम -विलोम, कपालभाती, सूर्यनमस्कार, ताडासन, वज्रासन, शितली, सुखासन तथा अन्य योगाचे प्रकार केले़ यावेळी ग.नु. जाधव, माधव शेळके, युवराज वाठोरे, भीमराव मुनेश्वर व रामराव कदम, ओमप्रकाश नरवाडे, विठ्ठल कदम उपस्थित होते़जाहूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री (प.दे) जिल्हा परिषद शाळा चोंडी, जिल्हा परिषद शाळा बिल्लाळी व जाहूरसह शाळेत योग दिवस साजरा केला़ संजय पांचाळ, कल्याण इंगळे (चोंडी) व बिल्लाळी मुख्याध्यापक सिरंजीपालवार यांच्या मार्गदर्शनानुसार योगा करण्यात आला़कंधार : श्री.शिवाजी कॉलेज, कंधार येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागाने कार्यक्रम आयोजित केला होता़ प्राचार्य डॉ़जी.आर.पगडे, कॅप्टन प्रा.डॉ.दिलीप सावंत, कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. माधव कदम, प्रा.संतोष राठोड, क्रीडा संचालिका प्रा.डॉ.सी.एन.हनुमंते, प्रा.डॉ.एस.एस.खामकर, प्रा.एस.पी. गुटे आदींचा सहभाग होता. योग शिक्षक प्रा.अशोक लिंगायत, प्रा.शिवराज चिवडे यांनी योगाची प्रात्यक्षिके दाखविली़नायगाव बाजार : येथील जनता हायस्कूल क़म़वि़ मध्ये जागतिक योग दिनानिमित्त योगशिबीर घेण्यात आले़ विद्यार्थ्यांबरोबर शाळेतील शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते़ योगा विषयीचे महत्त्व प्रा़शोभा शिंदे, उपप्राचार्य मो़ज़ चव्हाण, कदम, शेंडगे यांनी समजून सांगितला़ काही प्रात्यक्षिकही करून दाखवले़ यावेळी प्राचार्य के़जी़ सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक एम़एस़ वाघमारे, सा़रा़ जाधव, रा़ना़मेटकर, प्रा़देवडे, प्रा़पावडे, प्रा़पवार आदी उपस्थित होते़मुख्य पोस्ट कार्यालयात टपाल कर्मचाऱ्यांचा योगामुुख्य पोस्ट आॅफिसमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्ताने डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांनी टपाल कर्मचाºयांबरोबर योग केले़ या योगशिबिरामध्ये सहायक डाक अधीक्षक डॉ.नागरगोजे, सहायक डाक अधीक्षक एस.एन.आंबेकर, सहायक डाक अधीक्षक आर.व्ही.पालेकर, डाक निरीक्षक किनवट अभिनवसिंह, व सर्व कर्मचारी व महिला कर्मचारी उपस्थित राहून योग दिवस साजरा केला.यावेळी कर्मचाºयांना योगशिक्षकांनी विविध आसने शिकविली़ तसेच योगामुळे तणावमुक्ती होत असून आरोग्य चांगले राहते याचे महत्व पटवून दिले़केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात योग दिनमुदखेड : येथील केंद्रीय पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयात (सी.आर.पी.एफ कॅम्प) मध्ये सकाळी ७:०० वाजता या केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयाचे पोलिस महानिरीक्षक राकेशकुमार यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा योग दिन साजरा करण्यात आला.केंद्रीय पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात या योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याच महाविद्यालयाचे योग प्रशिक्षक आर.के.भेद्रे यांनी यांनी उपस्थित असलेल्या अधिकारी, जवान, प्रशिक्षणार्थी स्टाफ,स्थानिक नागरिक,पत्रकार यांना योग अभ्यासाचे शिक्षण दिले. तसेच योगामुळे आपल्या देहाला-शरीराला होणारे अनेक फायदे या बाबतीत सविस्तर माहिती दिली.केंद्रीय पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या कंमान्डो कोर्सच्या प्रशिक्षाणाथीर्नी या योग संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी पोलिस महानिरीक्षक योगाचे महत्त्व सांगत प्रत्येक दिवशी केले पाहिजे असे प्रतिपादन करुन या कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी डॉ.मिश्रा, अधिकारी प्रवीण पाटील, कपिल बेनीवाल, कर्मचारी राजेंद्र गवळी, प्रवीण शिंदे यांच्यासह अनेक प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि जवान उपस्थिती होती.
अवघा नांदेड जिल्हा झाला योगमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:14 AM
जागतिक योग दिवस नांदेड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला़ ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयात योग दिनानिमित्त भल्या पहाटेच योगा करण्यात आला़
ठळक मुद्देविविध शाळांमध्ये चिमुकल्यांचा उत्साह; कर्मचाऱ्यांनीही केली योगासने